Rishabh Pant, Urvashi Rautela : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि क्रिकेटर ऋषभ पंत (Rishabh Pant) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. आता उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतच्या सोशल मीडिया पोस्टवर प्रत्युत्तर दिले आहे. तिने रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने 'मिस्टर आरपी' बद्दल एक किस्सा सांगितला. आता हा मिस्टर आरपी म्हणजे ऋषभ पंतच!


तिच्या या मुलाखतीनंतर ऋषभ पंतने केलेली एक इन्स्टा स्टोरी व्हायरल झाली. यात असे लिहिले होते की, ‘माझा पिच्छा सोड ताई, खोटं बोलण्याला देखील हद्द असते.’ यावर प्रतिक्रिया देत आता उर्वशी रौतेलाने देखील एक पोस्ट शेअर केली आहे.


काय म्हणाली उर्वशी रौतेला?


ऋषभची खिल्ली उडवत उर्वशीने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, 'छोटू भैय्याने बॅट बॉलच खेळलं पाहिजे. मी मुन्नी नाही, तुझ्यासाठी बदनाम होऊ बाळा. आरपी छोटू भैयाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. शांत असलेल्या मुलीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू नका.'


पाहा पोस्ट :



मुलाखतीत काय म्हणाली उर्वशी?


अभिनेत्री उर्वशी रौतेलाने नुकतीच एक मुलाखत दिली, ज्यामध्ये तिने आरपीबद्दल एक किस्सा सांगिताना म्हणाली की, 'मी वाराणसीमध्ये शूटिंग करून दिल्लीला आले होते, जिथे माझा एक शो होणार होता. मी दिवसभर शूटिंग केले. तेव्हा आरपी मला भेटायला आला होता आणि तो लॉबीमध्ये माझी वाट पाहत होता. 10 तासांच्या शूटिंगनंतर मी परत आले, तेव्हा थकले होते आणि झोपी गेले. त्यानंतर मला कितीतरी वेळा फोन आला, पण झोपेत असल्यामुळे मला कळलेच नाही. जाग आली तेव्हा मला 16-17 मिस्ड कॉल्स दिसले, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मग मीच त्याला म्हणाके की, तू मुंबईला आल्यावर तिथे भेटू.’


ऋषभ पंतची प्रतिक्रिया...


ऋषभने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्याने कोणाचेही नाव घेतले नव्हते. ऋषभने लिहिले की, 'प्रसिद्धी आणि बातम्या मिळविण्यासाठी काही लोक मुलाखतीत खोटे कसे बोलू शकतात? हे विचित्र आहे. काही लोकांना नाव कमावण्याची आणि प्रसिद्ध होण्याची इतकी भूक असते, हे दुःखद आहे. ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो. या पोस्टसोबतच्या हॅशटॅगमध्ये ऋषभने लिहिले होते की, 'पिच्छा सोड ताई’, ‘खोट्याला मर्यादा असते’. मात्र, काही वेळाने त्याने ही स्टोरी डिलीट केली.