Shweta Tiwari on Intimate Scenes : मालिकाविश्वातून प्रेक्षकांच्या घरोघरी पोहचलेली अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी (Shweta Tiwari). आजही तिच्या अभिनयाचे आणि तिचे लाखो चाहते आहेत. अभिनेत्री म्हणून या जगात वावरताना श्वेताला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. ट्रोलिंग हे काही त्यात नवीन नाही. पण याच ट्रोलर्सना श्वेताना आता सणसणीत उत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय.
श्वेता ही कधी तिच्या सिनेमांमुळे, त्यातीच पात्रांमुळे तर कधी त्यामधील काही सीन्समुळे बरीच चर्चेत असते. नुकतच तिला तिच्या एका सीरीजमधील इंटिमेट सीन्सवरुन ट्रोल करण्यात आलं. श्वेताच्या अनेक सोशल मीडिया पोस्टही कामयचं चर्चेत असतात. पण या सगळ्यावर श्वेताने भाष्य केलं असून तिने या ट्रोलर्सना सणसणीत उत्तर दिलं आहे.
श्वेताचं ट्रोलर्सना उत्तर
हम तुम और देम या सीरिजमध्ये श्वेताने काही इंटीमेट सीन्स केलेत. त्यावर अनेकांनी तिला ट्रोल केल्याचं पाहायला मिळालं आहे. यावर श्वेताने म्हटलं की, जे लोक हे आवडीने पाहतात,तेच लोक टीका करायला पुढे येतात. या सीरिमध्ये श्वेताने अक्षय तिवारीसोबत काही इंटिमेट सीन्स केलेत. त्यामुळे श्वेताला ट्रोल करण्यात आलं.
पुढे तिने म्हटलं की, जे लोक यापेक्षाही अश्लील कंटेट पाहतात, तेच लोक ट्रोल करतात. पण हेच लोक जास्त इंटिमेट सीन्स असणारे हॉलीवूड सिनेमे बघतात. पण मी केलं तर त्याला विरोध करुन हॉलीवूड शो बघतातच. बरं पुढे जाऊन हे लोक एकमेकांना तो सीन कसा आहे हे ही सांगतात. पण माझ्या सीरिजमधला इंटिमेट सीन त्यांना नको असतो. आपल्या समाजात दोन्ही बाजूंनी बोलणारी लोकं आहेत. दुटप्पी भूमिका घेणाऱ्या या लोकांना खरंतर लाज वाटायला हवा.