Shriya Saran Unknown Fact : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री श्रिया सरन हिचा आज 11 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. श्रिया सरनचा आज 42 वा वाढदिवस आहे. श्रिया सरन हिने अनेक दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत शिवाजी द बॉस चित्रपटातील भूमिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर श्रिया सरन दृष्यम चित्रपटामुळे स्टारडम मिळालं. अजय देवगणची पत्नी बनून श्रियानं चाहत्यांच्या मनावर वेगळी छाप पाडली. श्रिया सरनच्या वाढदिवसानिमित्त तिच्या बद्दल खास गोष्टी जाणून घ्या.


बॉलिवूडचा रोमँटिक हिट चित्रपट गमावला


अभिनेत्री श्रिया सरनने (Shriya Saran) बॉलिवूडचा रोमँटिक हिट चित्रपट गमावला होता. अभिनेत्री दिया  मिर्झा (Dia Mirza) आणि आर माधवन  (R Madhwan) यांच्या 'रहना है तेरे दिल में' या चित्रपटाला अनेकांची पसंती मिळाली होती. या रोमँटिक हिट चित्रपटासाठी दिया मिर्झा नव्हे तर श्रिया सरन पहिली पसंती होती, पण तिने हा चित्रपट गमावला होता. त्यानंतर निर्मात्यांनी दिया मिर्झाला या चित्रपटासाठी साईन केलं.


श्रिया सरनचं बालपण कसं गेलं?


श्रिया सरनचा जन्म 11 सप्टेंबर 1982 रोजी उत्तराखंडच्या हरिद्वार  येथे झाला. श्रिया सरनचं शिक्षण दिल्लीत झालं. तिचे वडील पुष्पेंद्र सरन भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड अर्थात भेलमध्ये काम करत होते, तर आई नीरजा सरन दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिका होत्या. श्रियाला लहानपणापासून नृत्याची आवड होती, त्यामुळे तिला आईनं नृत्याचं प्रशिक्षण दिलं. कॉलेजमध्ये असतानाही नृत्य स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घ्यायची.


म्युझिक अल्बममुळे करिअरला मिळाली दिशा


डान्स स्पर्धेत भाग घेत असतानाच श्रियाला रेणू नाथनच्या थिरकती क्यूं हवा या म्युझिक अल्बममध्ये काम करण्याची संधी मिळाली. या म्युझिक अल्बमवर काम करत असतानाच श्रिया सरनला रामोजी फिल्म्सचा 'इष्टम' हा चित्रपट मिळाला, त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही.


आर माधवनला I Love You म्हणू शकली नाही


अभिनेत्री श्रिया सरन हिला शिवाजी द बॉस आणि दृश्यम चित्रपटाामधून प्रसिद्धी मिळाली, पण तिला रोमँटिक बॉलिवूड चित्रपटाची ऑफर गमवावी लागली होती. श्रिया सरनने माधवनच्या 'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटासाठी ऑडिशनही दिली होती. त्यादरम्यान श्रियाला माधवनच्या डोळ्यात बघून आय लव्ह यू म्हणायचं होतं. हा डायलॉग श्रियाने अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला, पण डायलॉग बोलण्यापूर्वीच तिला हसू यायचं, त्यामुळे तिला हा चित्रपट गमवावा लागवा आणि दिया मिर्झाला चित्रपटाची संधी मिळाली.