Shri Krishna Actor Sarvadaman Banerjee Latest Pic : रुपेरी पडद्याप्रमाणे छोट्या पडद्यावरील अनेक अभिनेते आपल्या फिटनेसकडे खूप लक्ष देतात. फिट राहण्यासाठी ते फक्त व्यायम करत नाहीत तर खास डाएटदेखील करतात. छोट्या पडद्यावरील 'कृष्णा'चाही यात समावेश आहे. छोट्या पडद्यावर आजवर अनेक अभिनेत्यांनी श्रीकृष्णाची भूमिका साकारली आहे. पण रामानंद सागर (Ramanand Sagar) यांच्या 'कृष्णा' (Krishna) या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या सर्वदमन डी. बॅनर्जी (Sarvadaman Banerjee) यांची क्रेझ चाहत्यांमध्ये आजही कायम आहे. सर्वदमन डी. बॅनर्जी आज वयाच्या 58 व्या वर्षीदेखील फिट आहेत.


सर्वदमन डी. बॅनर्जी यांचा 'तो' फोटो व्हायरल (Sarvadaman D Banerjee Photo Viral)


सर्वदमन डी. बॅनर्जी सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. अनेकदा ते व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. सर्वदमन डी. बॅनर्जी यांच्या फिटनेससमोर अनेक तरुण आणि आघाडीचे बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील मागे पडले आहेत.






सर्वदमन डी. बॅनर्जी यांच्या फोटोवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव


सर्वदमन डी. बॅनर्जी 'कृष्ण' या भूमिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचले आहेत. या मालिकेत त्यांनी कृष्णासह विष्णुचीही भूमिका वठवली होती. पुढे 'कृष्णा' या नावानेच ते ओळखले जाऊ लागले. सर्वदमन यांच्या व्हायरल होणाऱ्या फोटोवर चाहत्यांनी आता कमेंट्सचा वर्षाव केला आहे. "भीमरुपी कृष्णा", फिटनेसफ्रिक श्रीकृष्ण, कमाल बॉडी, जय श्री कृष्ण, सुपर फिटनेस लूक, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 


सर्वदमन डी. बॅनर्जी यांच्याबद्दल जाणून घ्या... (Who is Sarvadaman D. Banerjee)


सर्वदमन यांनी छोट्या पडद्यावरील मालिकांसह अनेक सिनेमांतही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. हिंदी सिनेसृष्टीसह त्यांनी बंगाली, तेलुगू इंडस्ट्रीमध्येही काम केलं आहे. 'गॉडफादर' (Godfather) या तेलुगू सिनेमासह 'एमएस धोनी: अॅन अनटोल्ड स्टोरी' या सिनेमांतही त्यांनी काम केलं आहे.


सर्वदमन डी. बॅनर्जी यांचा जन्म 14 मार्च 1965 रोजी उत्तर प्रदेशातील मगरवाड गावात झाला. कृष्णा या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचल्यानंतर त्यांनी अनेक सिनेमांत काम केलं. तसेच अर्जुना, ओम नम: शिवाय, जय गंगा मैया या मालिकांमध्येही काम केलं.


संबंधित बातम्या


Dum Maro Dum:  देव आनंद आणि झीनत अमान यांच्या चित्रपटातील 'दम मारो दम' या गाण्यावर सरकारने 'का' बंदी घातली होती?