Shreya Ghoshal Higest Paid Singer : श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) बॉलिवूडची एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या आवाजाचा मोठा चाहतावर्ग आहे. श्रेयाचं नाव बॉलिवूडच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. फक्त आवाजच नव्हे तर सौंदर्याच्या बाबतीतही श्रेयाने बाजी मारली आहे. तिच्या सौंदर्या पुढे आघाडीच्या बॉलिवूड गायिकादेखील मागे पडल्या आहेत. 


श्रेया घोषालच्या गाण्यांवर बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) ते ऐश्वर्या रायपर्यंत (Aishwarya Rai) अनेक अभिनेत्री थिरकल्या आहेत. अनेक सुपरहिट गाण्यांना तिने आवाज दिला आहे. न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार, श्रेया घोषालची एकूण संपत्ती 180 ते 185 कोटींच्या आसपास आहे. आपल्या जादूई आवाजाने श्रेयाने अल्पावधीतच स्वत:ला सिद्ध केलं आहे. आज प्रत्येक व्यक्ती तिचं गाणं आवडीने ऐकतो. 


श्रेया घोषाल देते रिहानालाही टक्कर


हॉलिवूड गायिका रिहानाच्या कार्यक्रमाची क्रेझ आजही कायम आहे. दुसरीकडे आपली भारतीय रिहानाही काही कमी नाही. डीएनच्या रिपोर्टनुसार, श्रेया घोषाल भारतीय चलनानुसार रिहानाच्या रेट कॉर्डला टक्कर देते. 






श्रेया घोषाल एका गाण्यासाठी किती मानधन घेते? (Shreya Ghoshal Song Charges)


श्रेया घोषाल एक गाणं गाण्याचे 25 लाख रुपये मानधन घेते. अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमातही श्रेयाने गाणं गायलं होतं. तिचा सुपरएनर्जेटिक परफॉर्मेंसने उपस्थितांची मने जिंकली. या कॉन्सर्टमध्ये श्रेयाने सोलो परफॉर्मेंस दिला होता. तसेच काही गाणी तिने अरिजीत सिंहसोबत गायली होती.


200 पेक्षा अधिक गाण्यांना श्रेयाचा आवाज


श्रेया घोषाल 'सारेगमप' या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या कार्यक्रमाने ती रातोरात सुपरस्टार गायिका झाली. त्यावेळी बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना तिचा आवाज आवडला आणि त्यांनी तिला 'देवदास' या सिनेमातील गाणी गाण्याची संधी दिली. या सिनेमाच्या माध्यमातून श्रेयाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आतापर्यंत गायिकेने 200 पेक्षा अधिक गाणी गायली आहे. हिंदीसह इतर भाषांमधील गाणीदेखील तिने गायली आहेत. श्रेयाने 'चिकनी चमेली','सिलसिला ये चाहत का','बैरी पिया','मेरे ढोलन सुन','ये इश्क है' सारख्या गाण्यांना आपला आवाज दिला आहे. तिची ही गाणी चाहत्यांच्यादेखील पसंतीस उतरली आहेत.


संबंधित बातम्या


HBD Shreya Ghoshal : आईकडून मिळाला संगीताचा वारसा, ‘सारेगमप’मधून केली करिअरची सुरुवात! वाचा श्रेया घोषालबद्दल...