Helan Birthday: वयाच्या १९ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या हेलनचा बर्मामध्ये जन्म झाला होता. आपल्या नृत्यानेच नाही तर अभिनयानंही लोकांच्या मनात राज्य करणाऱ्या हेलनचा आज वाढदिवस आहे. बॉलिवूडमध्ये अशा कितीतरी अभिनेत्री आहेत ज्या केवळ त्यांच्या आयटम साँगनं लोकांच्या लक्षात राहिल्यात. ब्लॅक् अँड व्हाईट पडद्यापासून आपल्या धमाकेदार डान्सनं नशा चढवणारी हेलन प्रसिद्ध नृत्यांगणा हेलननं कमी वयातच आपल्या बोल्ड नृत्यानं अनेकांच्या मनात घर केलं. अवघ्या १९ व्या वर्षी हावडा ब्रीज सारखा मोठा ब्रेक हेलनला मिळाला आणि हे नाव प्रेक्षकांच्या मनावर कोरलं गेलं.
मेरा नाम चिन चिन चू या गाण्यानं हेलनचं नशीबच बदलून टाकलं. त्यानंतर ती बॉलिवूडची पहिली आयटम गर्ल बनली. तिच्या नृत्याव्यतिरिक्त आणखी एका गोष्टीमुळे हेलन अनेकांच्या गॉसिपचा विषय झाली होती. ते म्हणजे सलीम खानशी लग्नाचा. विवाहित असतानाच त्यांनी हेलनला दुसरी पत्नी म्हणून स्विकारले. पहिले लग्न वाढदिवसादिवशीच तुटले आणि नंतर ती सलीम खानच्या प्रेमात पडली.
पहिलं लग्न तुटलं, सलीम खानच्या प्रेमात पडली
बॉलिवूडची पहिली आयटम गर्ल म्हणून प्रसिद्ध झालेल्या हेलननं तिने 1957 मध्ये दिग्दर्शक पीएन अरोरासोबत लग्न केले. पीएन अरोरा हेलनपेक्षा 27 वर्षांनी मोठे होते. पण 16 वर्षांनंतर हेलनच्या 35 व्या वाढदिवसाला हे नाते तुटले. पीएन अरोरासोबतचे नाते तुटल्यानंतर हेलनच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. त्यानंतर 1962 मध्ये हेलन आणि सलीम खान यांची भेट 'काबिल खान' चित्रपटादरम्यान झाली. या कठीण काळात सलीम हेलनचा आधार बनला आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.
विवाहित असूनही सलीम खाननं केलं दुसरं लग्न
हेलनच्या अडचणी संपवण्यासाठी सलीम खान यांनी तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि विवाहित असूनही त्यांनी हेलनला आपल्या घरात दुसरी पत्नी म्हणून स्वीकारले. दोघांनी 1980 मध्ये लग्न केले. मात्र, त्याची पहिली पत्नी आणि मुलानेही या लग्नाविरोधात बंड केले. सलीम खानची चारही मुलं त्यांच्या आईसोबत उभी होती. पण काळाने वाढणारे अंतर आता संपवले आहे. आता त्यांचे जग आज जगासमोर दिसत असलेल्या चित्रांइतकेच सुंदर आहे.
हेलनचा आज वाढदिवस, किती वय आहे हेलनचं?
वयाच्या 19 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या हेलनचा जन्म 21 नोव्हेंबर 1938 रोजी बर्मामध्ये झाला. त्याने केवळ आपल्या नृत्यानेच नव्हे तर आपल्या अभिनयानेही लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले. हेलन यंदा 86 वा वाढदिवस ती साजरा करणार आहे.