Shivrayancha Chhava : 'शिवरायांचा छावा' (Shivrayancha Chhava) हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'शिवरायांचा छावा'ची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. दमदार पोस्टरनंतर आता या सिनेमातील "सिंहासनी बैसले शंभू राजे" (Sinhasani Baisale Shambhu Raje) हे गीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या भव्यदिव्या गीताने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
"सूर्याच्या तप्त आभाळी, ही गरुडाची रे झेप..जाहला बघा संपूर्ण,नृप शंभूंचा अभिषेक", असे या गीताचे बोल आहेत. 'शिवरायांचा छावा' या मराठीतल्या पहिल्या भव्य सिनेमातील राज्याभिषेकावरील प्रदर्शित झालेल्या गीताची सध्या सर्वत्र चांगलीच चर्चा आहे. सोशल मीडियावर हे गीत धुमाकूळ घालत आहे.
"सिंहासनी बैसले शंभू राजे" गीताचा सोशल मीडियावर धुमाकूळ
छत्रपती संभाजी राजे यांनी त्यांच्या कारकिर्दीत दाखवलेले शौर्य आणि दिलेले योगदान लक्षणीय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी राजे यांनी अडचणीच्या काळात मराठा साम्राज्य ताब्यात घेतले. संभाजी महाराजांनी 16 जानेवारी 1681 रोजी आपला राज्याभिषेक केला. छत्रपती संभाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा भव्य आणि उत्साहात साजरा करण्यात आला होता. हाच स्वराज्याचा दुसरा देदिप्यमान आणि भव्यदिव्य राज्याभिषेक सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवायचा असेल तर छत्रपती संभाजी महाराजांवरील 'शिवरायांचा छावा' या मराठीतल्या पहिल्या भव्य सिनेमातील राज्याभिषेकावरील प्रदर्शित झालेल्या गीतातून याची झलक पाहायला मिळत आहे.
राजमाता जिजाऊ आऊसाहेब आणि छत्रपती शिवराय यांच्या आशीर्वादाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे भव्यदिव्य गीत 'सिंहासनी बैसले शंभू राजे' (Sinhasani Baisale Shambhu Raje) हे गीत आज रिलीज करण्यात आले आहे. सिनेप्रेक्षकांच्या हे गाणं पसंतीस उतरलं आहे.
'शिवरायांचा छावा' कधी रिलीज होणार? (Shivrayancha Chhava Release Date)
'शिवरायांचा छावा' या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या भूषण पाटील याचे तेजस्वी आणि पराक्रमी रूप पाहायला मिळतंय. दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी या सिनेमाच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'शिवरायांचा छावा' हा सिनेमा 16 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
संबंधित बातम्या