69th Filmfare Awards : 69 व्या फिल्मफेयर पुरस्कारांची (69th Filmfare Awards) घोषणा झाली आहे. हिंदी सिनेसृष्टीसाठी हा महत्त्वाचा पुरस्कार सोहळा आहे. नॉमिनेशनमध्ये शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) आणि 'डंकी' (Dunki) या सिनेमांसह रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहेत. 


69 वा फिल्मफेयर पुरस्कार सोहळा गुजरातमधील गांधीनगरमध्ये होणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. 'फिल्मफेयर अवॉर्ड्स 2024' करण जोहर (Karan Johar), आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि मनीष पॉल (Manish Paul) होस्ट करणार आहेत. 27-28 जानेवारी 2024 दरम्यान हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. 


69 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्सची नॉमिनेशन यादी आता समोर आली आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानला जवान आणि डंकीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं आहे. तसेच रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) या सिनेमाला 19 कॅटीगरीमध्ये नॉमिनेशन मिळालं आहे. जाणून घ्या नॉमिनेशनची संपूर्ण यादी


सर्वोत्कृष्ट चित्रपट


- 12 वीं फेल
- अॅनिमल
- जवान
- ओह माय गॉड 2
- पठाण
- रॉकी और रानी की प्रेम कहानी


सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक


- अमित राय (ओह माय गॉड)
- अॅटली (जवान)
- करण जोहर (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
- संदीप रेड्डी वांगा (अॅनिमल)
- सिद्धार्थ आनंद (पठाण)
- विधु विनोद चोप्रा (12 वीं फेल)


सर्वोत्कृष्ट अभिनेता 


- रणबीर कपूर (अॅनिमल)
- रणवीर सिंह (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
- शाहरुख खान (डंकी)
- शाहरुख खान (जवान)
- सनी देओल (गदर 2)
- विकी कौशल (सॅम बहादुर)


सर्वोत्कृष्ट अभिनेत्री 


आलिया भट्ट (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
भूमी पेडणेकर (थँक यू फॉर कमिंग)
दीपिका पादुकोण (पठाण)
कियारा आडवाणी (सत्यप्रेम की कथा)
रानी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे)
तापसी पन्नू (डंकी)


सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता


आदित्य रावल (फराज)
अनिल कपूर (अॅनिमल)
बॉबी देओल (अॅनिमल)
इमरान हाशमी (टायगर 3)
तोता रॉय चौधरी (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
विकी कौशल (डंकी)
शबाना आझमी (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
तृप्ति डिमरी (अॅनिमल)
यामी गौतम (ओह माय गॉड 2)


सर्वोत्कृष्ट कथानक 


अमित राय (ओह माय गॉड 2)
अनुभव सिन्हा (भीड)
अॅटली (जवान)
देवाशीष मखीजा (जोरम)
इशिता मोइत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
करण शर्मा (सत्यप्रेम की कथा)
पारिजात जोशी आणि तरुण डुडेजा (धक धक)
सिद्धार्थ आनंद (पठाण)


संबंधित बातम्या


Filmfare Awards 2024 : यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार गुजरातमध्ये; 'या' दिवशी होणार अवॉर्ड सेरेमनी