Raj Kundra Case: फसवणुकीच्या प्रकरणी एका व्यावसायिकाने दाखल केलेल्या गुन्ह्यात आपलं नाव असल्याचं पाहून धक्का बसल्याची प्रतिक्रिया अभिनेत्री शिल्पा शेट्टीने दिली आहे. नाव आणि प्रतिष्ठा खराब होत असल्याने वेदना होतात असं ती म्हणाली. बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर एक निवेदन जारी करुन आपली भूमिका मांडली आहे. मुंबईतील एका व्यावसायिकाने शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्राविरुद्ध 1.51 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नितीन बाराई यांच्या तक्रारीनुसार वांद्रे पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आले आहे. 


'धडकन' स्टार शिल्पा शेट्टी म्हणाली की, "राज आणि माझ्याविरुद्ध नोंदवलेल्या एफआयआरमुळे मला धक्का बसला आहे. SFL FITNESS PVT LTD चा डायरेक्टर काशिफ खानने देशभरात SFL फिटनेस जीम उघडण्यासाठी SFL ब्रॅंडच्या नावाचे अधिकार घेतले होते. मी गेले 28 वर्ष अथक परिश्रम घेतले आहेत. पण या फसवणुकीच्या प्रकरणामुळे माझ्या नावाला आणि प्रतिष्ठेला धक्का बसत आहे".





शिल्पा पुढे म्हणाली, "आम्हाला त्याच्या कोणत्याही व्यवहाराची माहिती नाही किंवा आम्हाला त्याच्याकडून एक रुपयादेखील मिळालेला नाही. सर्व फ्रँचायझींनी थेट काशिफशी व्यवहार केला आहे. काशिफ खानच्या ताब्यात असलेली ती कंपनी 2014 सालीच बंद झाली होती. मी गेल्या काही दिवसांपासून खूप मेहनत घेतली आहे. माझ्या या मेहनतीला आता 28 वर्ष झाली आहेत. माझे नाव आणि प्रतिष्ठा खराब होत असल्याने मला खूप वेदना होत आहेत. एक स्वाभिमानी भारतीय नागरिक असल्यामुळे माझ्या हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे".


संबंधित बातम्या


शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ, फसवणूक तसेच धमकावल्याचा गुन्हा दाखल 


शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ; दोघांविरोधात धमकी आणि फसवणुकीचा गुन्हा नोंद


In Pics | पार्नोग्राफी प्रकरणानंतर शिल्पा शेट्टी राज कुंद्रासह देवीच्या चरणी


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha