Kartik Aaryan : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) आगामी धमाका (Dhamaka) सिनेमा 19 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सिनेमातील कलाकार सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. दरम्यान कार्तिक आर्यन आणि धमाका सिनेमाचे दिग्दर्शक राम माधवानी यांनी एक खुलासा केला आहे. कार्तिक आर्यनच्या धमाका सिनेमाने प्रदर्शनाआधीच अनेक रेकॉर्ड केले आहेत. कार्तिक आर्यनने केवळ आठ दिवसांत सिनेमाची शूटिंग पूर्ण केली आहे.
कार्तिक आर्यनने सिनेमाच्या शूटिंगसंदर्भात माहिती देत म्हटले, "धमाका सिनेमाची शूटिंग एका खोलीत पूर्ण झाली आहे". धमाकाचे दिग्दर्शक राम माधवानी शूटिंग संदर्भात म्हणाले, "सिनेमाच्या शूटिंगसाठी दोन खोल्यांची एक खोली बनवण्यात आली होती. पण हे फार कमी लोकांना माहीत आहे". कार्तिक आर्यन पुढे म्हणाला, "त्या एका खोलीत असंख्य कॅमेरे लावण्यात आले होते. तसेच अनेक सुविधादेखील त्या खोलीमध्ये होत्या".
धमाका सिनेमाची शूटिंग 40-50 दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यासाठी कार्तिकने 5 कोटींची मागणी केली होती. पण नंतर कार्तिकने 10 दिवसांतच सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले. 10 दिवसांत शूटिंग पूर्ण केल्याने कार्तिकने ठरलेल्या रकमेपेक्षा तीनपट पैसे घेतले.
कार्तिक आर्यनचा 'धमाका' चित्रपट हा कोरियन चित्रपट 'द टेरर लाइव'चा हिंदी रिमेक असणार आहे. कार्तिक यात अर्जुन पाठक या नावाजलेल्या पत्रकाराच्या भूमिकेत दिसून येणार आहे. हा चित्रपट भारतीय पत्रकारितेवर आधारित असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राम माधवानी यांनी केले असून रॉनी स्क्रूवाला यांनी याची निर्मीती केली आहे.
कार्तिक आर्यनचे आगामी सिनेमे
कार्तिक आर्यनचे अनेक चित्रपट सध्या पाइपलाईनमध्ये आहेत. कियारा आडवाणी सोबतचा 'भूल भूलैया', 'सत्यनारायण की कथा', 'फ्रेडी', 'कॅप्टन इंडिया' आणि समीर विध्वसांच्या आगामी चित्रपटाचा देखील यात समावेश असेल. काही दिवसांपूर्वी त्याला करण जौहरच्या 'दोस्ताना 2' मधून काढून टाकले होते. त्या चित्रपटात कार्तिक आर्यनच्या जागी आता खिलाडी अक्षय कुमार दिसणार आहे.
संबंधित बातम्या
स्वातंत्र्य भिकेनंच मिळालं, कंगना खरंच बोलली, विक्रम गोखलेंकडून समर्थन
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ, फसवणूक तसेच धमकावल्याचा गुन्हा दाखल
राजकुमार- पत्रलेखाची 'लगीनघाई', आज चंदीगडमध्ये सनई चौघडे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha