Sheezan Khan : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी शिझान खान (Sheezan Khan) सध्या चर्चेत आहे. आता पोलीस चौकशी दरम्यान शिझानला रडू कोसळलं आहे. चौकशीदरम्यान महिला पोलीस अधिकाऱ्यांसमोर शिझान रडू लागला.
अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शिझानची सध्या चौकशी सुरू आहे. तुनिषाला आत्महत्या करण्यासाठी शिझाननेच प्रवृत्त केल्याचा आरोप तुनिषाच्या आईने केला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान त्याला रडू कोसळलं आहे.
शिझान खानची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी सुरू
तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी आज सलग तिसऱ्या दिवशी शिझान खानची चौकशी सुरू आहे. तपास अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्रीलक्ष्मी बोरकर शिझानचा जबाब नोंदवत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जबाबादरम्यान पोलिसांसमोर शिझानला रडू कोसळलं आहे.
तुनिषा शर्मा आणि शिझान खान गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनमध्ये होते. 'अली बाबा दास्तान-ए-काबुल' या मालिकेच्या सेटवर त्यांची भेट झाली होती. गेल्या 15 दिवसांपूर्वीचं त्यांचा ब्रेकअप झाला होता. ब्रेकअपमुळे तुनिषा डिप्रेशनमध्ये गेली होती.
तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. आतापर्यंत 14 लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. आत्महत्येपूर्वी तुनिषा आणि शिझानने एकत्र जेवण केलं असल्याची माहिती तुनिषाच्या आईने पोलिसांना दिली होती. जेवण केल्यानंतर लगेचच 15 मिनिटांनी तुनिषा आत्महत्या केली. या 15 मिनिटांत नेमकं काय घडलं याचा पोलीस तपास घेत आहेत.
शिझान खान कोण आहे? (Who Sheezan Khan)
शिझान खानला वसई न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शिझान खानचा जन्म 9 सप्टेंबर 1994 रोजी मुंबईत झाला. मुंबई विद्यापीठात शिक्षण घेतलेला शिझान एक उत्कृष्ट अभिनेता आणि मॉडेल आहे. शिझानला बालपणीच अभिनयाची आवड लागल्याने त्याने हेच करिअर निवडलं. 'जोधा अकबर' (Jodha Akbar) या मालिकेच्या माध्यमातून त्याने मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं.
तुनिषा शर्माच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. आज दुपारी तीन वाजता मीरा रोड येथे तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. तुनिषा शर्माच्या पार्थिवावर 25 डिसेंबर 2022 रोजी अंत्यसंस्कार होणार होते. पण तिची मावशी मुंबईत नसल्याने अंत्यसंस्कार पुढे ढकलण्यात आले. आता कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, तुनिषाच्या पार्थिवावर आज (27 डिसेंबर) अंत्यसंस्कार होणार आहेत.
संबंधित बातम्या