Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणाऱ्या सलमान खाानचा (Salman Khan) आज 57 वा वाढदिवस आहे. सलमान खानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पण काही सेलिब्रिटी सलमानच्या बर्थ-डे सेलिब्रेशनला हजर झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. सलमानच्या बर्थ-डे सेलिब्रेशनला शहरुख खान, अभिनेत्री संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. तसेच सलमान खानच्या कुटुंबातील काही सदस्य देखील बर्थ-डे सेलिब्रेशनमध्ये सामील झाले.
संगीता बिजलानी आणि सलमानचे फोटो व्हायरल
सलमान खानसोबत संगीता बिजलानी या अभिनेत्रीचं नाव जोडलं जातं. संगीता ही सलमानची एक्स गर्लफ्रेंड आहे, असंही म्हटलं जातं. सलमानच्या 57 व्या वाढदिवसाच्या पार्टीला संगीतानं ब्लु ग्लिटर ड्रेस, सिल्वर इअरिंग्स अशा लूकमध्ये हजेरी लावली. तर सलमान हा त्याच्या बर्थ-डे पार्टीला ऑल इन ब्लॅक अशा लूकमध्ये दिसला. या बर्थ-डे पार्टीमधील संगीता आणि सलमानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हायरल फोटोमधील या दोघांच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधलं. रिपोर्टनुसार, सलमान आणि संगीता हे जवळपास 10 वर्ष एकमेकांना डेट करत होते.
सलमानच्या बर्थ-डे सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सलमानचा केक कट करतानाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
सलमानचा आगामी चित्रपट
सलमान खानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्याच्या 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. आधी हा सिनेमा 23 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. हा सिनेमा येत्या वर्षात दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच आणखी दोन सिनेमांची तो लवकरच घोषणा करणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: