Shatrughna Sinha :  अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला सोनाक्षी (Sonakshi Sinha) आणि झहीरचा (Zaheer Iqbal) लग्नसोहळा अखेर पार पडला. वांद्रे येथे त्यांनी रजिस्टर लग्न करत नव्या नात्याची सुरुवात केली. पण सुरुवातीला सोनाक्षीच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध असल्याचं बातम्या वारंवार समोर येत होत्या. त्यातच शत्रुघ्न सिन्हा (Shatrughna Sinha) यांच्या प्रतिक्रियेमुळे वारंवार भुवया उंचावल्या जात होत्या. पण शेवट गोड म्हणत अखेर हे जोडपं लग्नबंधनात अडकलं आणि त्यांनी नव्या नात्याची सुरुवात केली. 


दरम्यान सोनाक्षीच्या लग्नानंतर शत्रुघ्न सिन्हा हे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. प्रत्येक बापासाठी लेकीची पाठवणी हा अत्यंत भावनिक असा क्षण असतो. पण तरीही लेकीच्या आनंदात सहभागी होत बापासाठी हा त्याच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण देखील असतो. असंच काहीसं शत्रुघ्न सिन्हा यांच्यादेखील बाबतीत झालं. 


शत्रुघ्न सिन्हा यांनी काय म्हटलं? 


सोनाक्षीच्या लग्नानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं की, 'जेव्हा बाप त्याच्या लेकीचा हात तिने निवडलेल्या मुलाच्या हातात देतो, या क्षणाची प्रत्येक बाप वाट पाहत असतो. माझी मुलगी झहीरसोबत जास्त आनंदी आहे आणि माझ्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. देवाचे आशीर्वाद त्यांच्यासोबत कायम राहू देत. '                                                                 






सोनाक्षी आणि झहीरची लव्हस्टोरी


सोनाक्षी आणि जहीर अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने (Salman Khan) आयोजित केलेल्या पार्टीत सोनाक्षी आणि जहीरची पहिली भेट झाली. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सोनाक्षी आणि जहीरने 'डबल XL' नामक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मागील वर्षी दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं प्रेम जगजाहीर केलं. दोघांनी आजवर एकमेकांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केलेले आहेत.  


ही बातमी वाचा : 


Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालचा विवाहसोहळा संपन्न, मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत केलं रजिस्टर लग्न