मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना यांच्या निधनाची अफवा आज दिवसभर वेगाने पसरली होती. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्या कथित निधनाच्या बातमीने अनेकांना धक्का बसला होता. एका व्यक्तीने सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूची बातमी पोस्ट केली आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. त्यानंतर मुकेश खन्ना यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना अनेकांचे फोन सतत येत होते. त्यामुळेच या परिस्थितीत स्वत: मुकेश खन्ना यांनी एका व्हिडिओद्वारे आपल्या मृत्यूच्या बातमीचं खंडन केलं आहे. 


बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मधील भीष्म पितामहांची भूमिका आणि नंतर ‘शक्तिमान’ या मालिकेतील मुख्य भूमिका साकारत प्रसिद्धी मिळवणार्‍या मुकेश खन्ना यांनी एबीपी न्यूजशी संवाद साधत एक व्हिडिओ संदेश शेअर केला आहे.


मुकेश खन्ना यांनी या व्हिडीओ मेसेजमध्ये म्हटलं की, "मी अगदी ठणठणीत आहेत, हे सांगण्यासाठी तुम्हा सर्वांसमोर आलो आहे. मला या अफवाचं खंडन करण्यास सांगितले गेले आहे. ज्या कुणी अशा प्रकारे ही बातमी पसरवली आहे, मी याचा निषेध करतो. ही सोशल मीडियाची एक समस्या आहे. मी सर्वांना सांगू इच्छितो मी पूर्णपणे ठीक आहे. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद सोबत असतील तर एखाद्याचे काय होऊ शकते का? माझ्याबद्दल काळजी व्यक्त केल्याबद्दल सर्वांचे आभार… मला बरेच फोन कॉल येत आहेत, म्हणून मी माझ्या चाहत्यांना सांगतो की माझी प्रकृती उत्तम आहे.


मीनाक्षी शेषाद्रीच्या अकाली मृत्यूच्या अफवांना पूर्णविराम, तिने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं...


काही दिवसांपूर्वी अमेरिकेत राहत असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांच्या निधनाची बातमी देखील खूप वेगाने पसरली होती. अशा परिस्थितीत मीनाक्षी शेषाद्री यांनी स्वतः दुसर्‍याच दिवशी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत मी ठणठणीत असल्याचं सांगितलं होतं. 


Exclusive: किरण खेर यांच्या मृत्यूच्या अफवा खूप अस्वस्थ करतात, खोट्या बातम्या पसरवू नका, अनुपम खेर यांचं आवाहन


गेल्या आठवड्यात अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर यांचं कर्करोगाने निधन झाल्याची अफवा झपाट्याने पसरली होती. अशा परिस्थितीत अनुपम खेर यांनी रात्री उशीरा ट्वीट करून या अफवेचं खंडन केले. त्यानंतर, एबीपी न्यूजशी खास बातचीत करताना अनुपम खेर म्हणाले की, किरण यांच्याबाबत पसरणाऱ्या अफवा मानसिक त्रास देतात.