IMDb Top 50  Web Series: IMDb हा चित्रपट, टेलिव्हिजन मालिकांशी संबंधित असणाऱ्या डेटाबेस माहितीचा संग्रह आहे. IMDb (www.imdb.com) या चित्रपट, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजच्या सर्वांत प्रसिद्ध सोर्सनं आज भारतातील IMDb युजर्सच्या पेज व्ह्यूजनुसार आजवरच्या टॉप 50 सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय वेब सीरिजची यादी घोषित केली आहे.

“आमच्या यादीमधील सर्वोच्च स्थानी असलेल्या दोन वेब सीरिज (सेक्रेड गेम्स आणि मिर्झापूर) ह्यांना पाच वर्षं पूर्ण झाले आहेत.  भारतातील वेब सीरिजच्या छोट्या पण लक्षवेधी इतिहासासंदर्भात आढावा सांगताना आम्हाला आनंद होत आहे,” असे IMDb इंडियाच्या प्रमुख यामिनी पतोडिया  यांनी सांगितलं. “स्ट्रीमिंग पर्यायांच्या वाढत्या संख्येसह भारतातील वेब सीरिजमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे.' असंही त्यांनी सांगितलं.

सेक्रेड गेम्सचे सह- दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी यांनी सांगितले, “IMDb युजर्सनं सेक्रेड गेम्सला पहिल्या क्रमांकाचे स्थान दिल्याचे कळाल्यानंतर मला अतिशय अभिमान वाटत आहे आणि आनंद होत आहे. या शोवर प्रेम करणा-या सर्व चाहत्यांचे मनापासून आभार'

IMDb ची आजवरच्या टॉप 50 सर्वांत प्रसिद्ध भारतीय वेब सीरिजची यादी-

सेक्रेड गेम्समिर्झापूरस्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरीद फॅमिली मॅनअॅस्पेरंट्सक्रिमिनल जस्टीसब्रीदकोटा फॅक्टरीपंचायतपाताल लोकस्पेशल ओपीएसअसूर: वेलकम टू यूवर डार्क साईडकॉलेज रोमान्सअपहरणफ्लेम्सधिंडोराफर्जीआश्रमइनसाईड एजअनदेखीआर्यागुल्लकटीव्हीएफ पिचर्सरॉकेट बॉयजदेल्ही क्राईमकँपस डायरीजब्रोकन बट ब्युटीफूलजामतारा: सबका नंबर आएगाताज़ा खबरअभयहॉस्टेल डेझरंगबाज़बंदीश बँडीटसमेड इन हेव्हनइममॅच्युअरलिटल थिंग्जद नाईट मॅनेजरकँडीबिच्छू का खेलदहन: राकन का रहस्यजेएल50राना नायडूरेसनफ्लॉवरएनसीआर डेजमहारानीमुंबई डायरीज 26/11चाचा विधायक हैं हमारेये मेरी फॅमिलीअरण्यक

1 जानेवारी 2018 ते 10 मे 2023 मध्ये भारतातील IMDb युजर्सच्या पेज व्ह्यूजच्या रँकिंगनुसार ही यादी IMDb नं तयार केली आहे. फर्जी, ताज़ा खबर, द नाईट मॅनेजर, आणि राना नायडू या 2023 मध्ये रिलीज झालेल्या  चार वेब सीरिजची नावं या यादीमध्ये आहेत. या यादीतील टॉप 10 सीरिजपैकी सेक्रेड गेम्स, मिर्झापूर, आणि क्रिमिनल जस्टीस या  तीन सीरिजमध्ये पंकज त्रिपाठीने महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या. 

जाणून घ्या IMDb विषयी

IMDb हा चित्रपट, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील माहितीचा जगामधील सर्वांत प्रसिद्ध सोर्स आहे.  IMDb ओरिजिनल व्हिडिओ सीरिजची आणि पोडकास्टसची निर्मितीसुद्धा करते. मनोरंजन उद्योगातील व्यावसायिकांसाठी IMDb हे IMDbPro आणि बॉक्स ऑफीस मोजो उपलब्ध करते. 

संंबंधित बातम्या

New Release On OTT: ओटीटीवर अॅडव्हेंचर आणि थ्रिलरचा तडका; या आठवड्यात रिलीज होणार हे चित्रपट आणि वेब सीरिज