Gauri Khan Birthday Special : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची (Shahrukh Khan) पत्नी गौरी खानचा (Gauri Khan) एक वेगळा चाहतावर्ग आहे. ती तिच्या स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते. गौरी तिच्या फॅशन सेन्समुळे अनेकदा चर्चेत असते. गौरी खान वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही खूपच स्टायलिश दिसते. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तिच्या खास गोष्टी...
गौरी खान कोट्यवधींची मालकीन
गौरी खानचा जन्म 8 ऑक्टोबर 1970 रोजी दिल्लीत झाला. तिनेदिल्ली विद्यापीठा अंतर्गत असलेल्या लेडी श्री राम कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. 2018 सालच्या 'फॉर्च्यून इंडिया' मॅगझिनच्या टॉप 50 पॉवरफुल महिलांच्या यादीत गौरीच्या नावाचा समावेश आहे. आज गौरी कोट्यवधींची मालकीन आहे. किंग खानच्या यशात गौरीचा मोठा वाटा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान आणि गौरी खानकडे 7304 कोटी संपत्ती आहे.
शाहरुख-गौरीची फिल्मी लव्हस्टोरी
रोमान्सचा बादशहा अशी शाहरुख खानची ओळख आहे. आजही अनेक मुली त्याच्यावर फिदा आहेत. पण हा बादशहा मात्र गौरीवर प्रेम करतो. शाहरुख गौरीच्या प्रेमात वेडा झाला होता. तिच्यासोबत लग्न करण्यासाठी त्याने धर्मदेखील बदलला होता. शाहरुख खान आणि गौरी खान यांनी एक, दोन नव्हे तर तीनदा लग्न केलं आहे. शाहरुख मुस्लिम होता आणि गौरी ब्राह्मण होती. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.
इंटिरियर डिझायनर ते निर्माती
गौरी खान एक प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहे. तिने 'मन्नत' सजवण्यासोबतच अनेक बॉलिवूड सुपरस्टार्सची घरे आणि बंगले सजवले आहेत. गौरी खान इंटिरियर डिझायनर असण्यासोबत रेड चिलीज प्रॉडक्शन हाऊसची सह-निर्मातीदेखील आहे. रेड चिलीजच्या बॅनरखाली तिने 'डार्लिंग्स', 'मैं हूं ना', 'ओम शांती ओम', 'माय नेम इज खान', 'हॅपी न्यू इयर', 'चेन्नई एक्सप्रेस' या सुपरहिट सिनेमांची निर्मिती केली आहे.
गौरी खानची संपत्ती किती आहे?
गौरी 1600 कोटींच्या संपत्तीची मालकीन आहे. गौरीचे रेड चिलीज एंटरटेनमेंट हे प्रोडक्शन हाऊस बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारे प्रोडक्शन हाऊस मानले जाते. किंगखानचा मन्नत 200 कोटींचा असल्याचे म्हटले जाते. तसेच गौरीचं स्वतःचं लक्झरी दुकानदेखील आहे. या दुकानाची किंमत 150 कोटी आहे.
संबंधित बातम्या