Munmun Dutta Faced Sexual Harassment : अभिनेत्री मुनमुन दत्ता ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेमुळे अभिनेत्री मुनमुन दत्ताला प्रसिद्धी मिळाली आहे. अभिनेत्री मुनमुन दत्ताने अलिकडेच मोठा खुलासा केला आहे. मुनमुन दत्तासोबत अनेकदा लैंगिक छळाच्या घटना घडल्याचा धक्कादायक खुलासा तिने केला आहे. यानंतर सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. खूप लहान वयातच आपल्याला लैंगिक छळाच्या घटनांना सामोरं जावं लागल्याचं मुनमुन दत्ताने सांगितलं आहे.


प्रसिद्ध अभिनेत्रीचा अनेकदा लैंगिक छळ


अभिनेत्री मुनमुन दत्ता फक्त एक वेळा नाही, तर अनेक वेळा लैंगिक शोषणाचा शिकार झाली आहे. मुनमुनने सांगितलं होतं की, ती लहान असताना तिच्या शेजारचे काका तिच्याकडे फार वाईट नजरेने पाहायचे. ते एक टक लावून पाहायचे, मला पकडायचे आणि धमकवायचे, की मी कुणाला याबद्दल सांगू नये. मी त्या माणसाला खूप घाबरायची. ती व्यक्ती ज्याने जन्मावेळी मला रुग्णालयात पाहिलं होतं आणि मी 13 वर्षाची झाल्यावर मला घाणेरड्या पद्धतीने स्पर्श करायचा कारण माझ्या शरीरात बदल झाला होता. 


"त्याने अचानक माझ्या अंडरवेअरमध्ये हात टाकला"


यापुढे तिने सांगितलं की, "मी माझ्या ट्युशन टीचरलाही खूप घाबरायची. त्याने माझ्या अंडरवेअरमध्ये हात टाकला होता. मी एका शिक्षकाला राखी बांधायची, पण तो विद्यार्थिर्नींचे ब्रा स्ट्रॅप खेचून त्यांच्या छातीवर मारुन त्यांना ओरडायचा". या सर्व घटनांमुळे तिला पुरुषांबद्दल द्वेष निर्माण झाला होता आणि ती पुरुषांच्या विरोधात होती, यातून तिला बाहेर पडायला खूप काळ गेला, असंही तिने सांगितलं होतं.


मुनमुन दत्ताचा धक्कादायक खुलासा 






लोकप्रिय टीव्हीशो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम बबिता जी म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता खूप लोकप्रिय आहे. ती घराघरात 'बबिता जी' म्हणून ओळखली जाते आणि सोशल मीडियावर ती खूप सक्रिय आहे. मुनमुन दत्ताचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने खूप कमी वयात इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला होता. मुनमुनने अनेक जाहिराती आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. एवढंच नाही तर तिने अभिनेता शाहरुख खानसोबत एका जाहिरातीतही काम केलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या


Happy Birthday Diljit : गुरुद्वारामध्ये गायनाला सुरुवात, आठव्या वर्षी सोडलं घर, कोट्यवधींचा मालक असलेल्या 'या' गायकाला ओळखलं का?