Shahid Kapoor Buy New Car : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) त्यांच्या सिनेमांमुळे चर्चेत असण्यासोबत लग्झरी लाईफस्टाइलमुळेदेखील चर्चेत असतो. गेल्या 20 वर्षांपासून शाहिद प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. शाहिदने आता नवी आलिशान कार विकत घेतली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.
शाहिद कपूरने मेहनतीच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केलं आहे. आजच्या घडीला त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आणि आलिशान घर आहे. आता त्याने नवी मर्सिडीज कार विकत घेतली आहे. सोशल मीडियावर त्याने नव्या कारसोबतचे फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांनी कमेंट्स करत अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
शाहिद कपूरची नवी कार (Shahid Kapoor Bought New Car)
शाहिद कपूरने नवी मर्सिडीज घेतली आहे. क्याने मर्सिडीज Maybach ही कार घेतली आहे. या गाडीची किंमत कोट्यवधी रुपयांच्या आसपास आहे. याआधी 2023 मध्ये शाहिदने मर्सिडीज Maybach S580 ही गाडी विकत घेतली होती. या गाडीची किंमत 2.8 कोटींच्या आसपास आहे. आता त्याच्या ताफ्यात आणखी एका गाडीचा समावेश झाला आहे.
शाहिदआधी 'या' बॉलिवूडकरांनी घेतली महागडी कार
शाहिदआधी अनेक बॉलिवूडकरांनी मर्सिडीज विकत घेतली आहे. अनिल कपूर यांनी दिवळीच्या मुहूर्तावर गाडी विकत घेतली होती. त्यांनी मर्सिडिज मेबैक एस-क्लास ही गाडी घेतली आहे. या गाडीची किंमत 2.69 ते 3.40 कोटींच्या आसपास आहे. तापसी पन्नूने गणेश चतुर्थीच्या आसपास मर्सिडीज मेबैक GLS 600 लग्झरी कार खरेदी केली आहे. श्रद्धा कपूरने दसऱ्याच्या मुहूर्तावर लाल रंगाची लॅम्बॉर्गिनी ह्यूराकन टेक्निका ही कार विकत घेतली आहे. या गाडीची किंमत चार कोटींच्या आसपास आहे.
शाहिदच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या... (Shahid Kapoor Upcoming Project)
शाहिद कपूरने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर त्याच्या आगामी 'देवा' (Deva) या सिनेमाची घोषणा केली आहे. हा सिनेमा दसरा 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमासह शाहिद जियो स्टुडियोज आणि दिनेश विजानच्या आगामी सिनेमातही तो झळकणार आहे. 9 फेब्रुवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती कृती सेननसोबत झळकणार आहे.
संबंधित बातम्या