मुंबई : बॉलिवूडचा चॉकलेट हिरो शाहिद कपूर आणि मीरा यांनी काहीच दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला. नुकतंच बाळाचं नामकरण करण्यात आलं असून तिचं नाव 'मिशा' असं ठेवण्यात आलं आहे. मीराचा 'मि' आणि शाहिदचं 'शा' ही आद्याक्षरं एकत्र करुन हे नाव ठेवण्यात आलं आहे.
'मिशाने बाबांना कुठेही जाणं अशक्य केलं आहे' अशा अर्थाचं ट्वीट शाहीदने केलं आहे. मिशा या शब्दाचा अर्थ 'देवासारखा' असल्याची माहिती आहे. शाहिद-मीरा यांच्या नावाचं मिलाफ साधत हे नाव ठेवण्यात आलं आहे.

https://twitter.com/shahidkapoor/status/777759699621994496
शाहिद आणि मीरा यांना 26 ऑगस्टला मुलगी झाली. त्यावेळीही ट्वीट करुन शाहिदने आपला आनंद व्यक्त केला होता. 'आणि ती आली आहे... आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद' असं शाहिदने म्हटलं होतं.

राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांनीही दोघांच्या नावांची आद्याक्षरं जुळवून 'आदिरा' असं लेकीचं नाव ठेवलं होतं.
शाहिदने नुकतंच कंगना रनौत आणि सैफ अली खानसोबत 'रंगून' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. तर संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'पद्मावती' चित्रपटात तो दिसण्याची शक्यता आहे.