'त्या' टॉपला समोरुन पिन लाव, नर्गिसला निर्मात्याची सूचना
एबीपी माझा वेब टीम | 18 Sep 2016 11:53 PM (IST)
मुंबईः अभिनेत्री नर्गिस फाखरीला एका वेगळ्याच अडचणीचा सामना करावा लागला. 'बँजो'च्या प्रमोशन दरम्यान नर्गिस आणि रितेश देशमुख डान्स प्लस या शोच्या सेटवर पोहचले. मात्र नर्गिसच्या टॉपवर आक्षेप घेण्यात आला. नर्गिसने घातलेला टॉप समोरुन उघडा असल्याने निर्मात्यांनी पीन लावल्याचा सल्ला दिला. डान्स प्लस हा कौटुंबिक शो आहे, त्यामुळे ओपन ड्रेसवर शूटिंग शक्य नसल्याचं सांगण्यात आलं.