Shaheed Diwas: देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भगत सिंह (Bhagat Singh), राजगुरु  (Rajguru) आणि सुखदेव (Sukhdev) यांना आजच्याच दिवशी 1931 मध्ये लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ देशभरात 23 मार्च हा 'शहीद दिन' (Shaheed Diwas) म्हणून मानला जातो. भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांनी देशाला स्वतंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला.  त्यांचे देशप्रेम तसेच त्यांचा स्वातंत्र्य लढा हा काही चित्रपटांमध्ये दाखवण्यात आला आहे. 


शहीद-ए-आझाद भगतसिंह (Shaheed-e-Azad Bhagat Singh)



1954 मध्ये प्रदर्शित झालेला शहीद-ए-आझाद भगतसिंह हा चित्रपट भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांच्या आयुष्यावर आधारित असणारा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात प्रेम आबेद, जयराज, स्मृती बिस्वास आणि आशिता मुझुमदार यांनी काम केलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन जगदीश गौतम यांनी केलं. 'सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में हैं' हे गाणं या चित्रपटात आहे. 




‘शहीद’ Shaheed (1965)


एस राम शर्मा दिग्दर्शित ‘शहीद’ हा चित्रपट 1965 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये मनोज कुमार, कामिनी कौशल, प्राण, इफ्तेखार, निरुपा रॉय, प्रेम चोप्रा, मदन पुरी आणि अन्वर हुसैन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.   




द लिजेंड ऑफ भगतसिंह (The Legend of Bhagat Singh)



द लिजेंड ऑफ भगतसिंह हा चित्रपट 2002 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. राजकुमार संतोषी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. तर या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. ‘द लीजेंड ऑफ भगतसिंग’ मध्ये भगतसिंह यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष  दाखवण्यात आला आहे.




2002 मध्ये द लिजेंड ऑफ भगतसिंह या चित्रपटाबरोबरच शहीद-ए-आझम (Shaheed-E-Azam), 23 मार्च 1931 : शहीद (23rd March 1931: Shaheed) हे देखील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. 


‘रंग दे बसंती’ Rang De Basanti (2006)


राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित, ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट 2006 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटात आमिर खान, आर माधवन, सिद्धार्थ नारायण, सोहा अली खान, कुणाल कपूर, शर्मन जोशी, अतुल कुलकर्णी आणि ब्रिटिश अभिनेत्री अॅलिस पॅटन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या कथानकाचं आणि चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. 


महत्वाच्या इतर बातम्या : 


Shaheed Din : शहीद भगत सिंह यांचे 10 मौलिक विचार, वाचा भगत सिंह काय म्हणाले?