Shah Rukh Khan Dunki New Song Banda Out : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या 'डंकी' (Dunki) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमातील 'बंदा' (Banda) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'बंदा' या गाण्याआधी 'लुटपुट गया', 'निकले थे कभी हम घरसे' आणि 'ओ माही' ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. आता या गाण्यातील चौथ्या गाण्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 


'बंदा' हे गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गाण्यात किंग खानचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. शाहरुखचा रोमँटिक आणि अॅक्शन मोड प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या गाण्यात तापसी पन्नूदेखील दिसत आहे. पंजाबी गायक दलजीत दोसांझ यांनी या गाण्याला आपला आवाज दिला आहे.


शाहरुखने शेअर केलं 'बंदा' गाणं (Banda Song Out)


शाहरुख खानने 'बंदा' या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच 'बंदा' हे गाणं गायल्याबद्दल त्याने दलजीत दोसांझचे आभार मानले आहेत. किंग खानने लिहिलं आहे,"दलजीत दोसांझ पाझीने 'बंदा' हे गाणं चांगलं गायलं आहे. थँक्यू अॅन्ड लव्ह यू पाझी..तुमच्यामुळे हे गाणं अधिक गाणं चांगलं आहे. तसेच तुमच्यामुळे सर्व मंडळी 'हार्डी'वर प्रेम करू लागले आहेत".






तगडी स्टारकास्ट असलेला 'डंकी'


'डंकी' या सिनेमात शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. तसेच तापसी पन्नू, बोमान इरानी, सतीश शाह, दिया मिर्जा, विक्रम कोचर आणि विकी कौशल हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'डंकी' या सिनेमात शाहरुख खान आणि तापसी पन्नूची जोडी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. शाहरुखच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी यांच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे.


शाहरुखच्या 'डंकी' या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहे. 'जवान' आणि 'पठाण' या सिनेमांनी जगभरात 2000 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं होतं. शाहरुखच्या 'पठाण', 'जवान' या सिनेमांनी 2023 हे वर्ष गाजवलं आहे. आता त्याचा 'डंकी' हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी सज्ज आहे. वर्षाच्या शेवटी 'डंकी' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करणार आहे. त्यामुळे या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमासाठी किंग खानने चांगलच मानधन घेतलं आहे.


संबंधित बातम्या


Shah Rukh Khan : बॉक्स ऑफिसचा बादशाह शाहरुख खान! 'डंकी'ने रिलीजआधीच केली 100 कोटींची कमाई