Shah Rukh Khan: काही दिवसांपूर्वी नीता मुकेश अंबानी यांच्या क्लचरल सेंटरचा (Nita Mukesh Ambani Cultural Center) उद्धाटन सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या सोहळ्याला अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि त्याच्या कुटुंबानं देखील हजेरी लावली होती. शाहरुखनं NMACC इव्हेंटमध्ये विविध गाण्यांवर डान्स केला. नुकताच शाहरुखचा NMACC इव्हेंटमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख हा पान खाताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरुखच्या हतात पान दिसत आहे. तो या व्हिडीओमध्ये ब्लॅक कलरचा पठाणी कुर्ता आणि ब्लॅक पँट अशा लूकमध्ये दिसत आहे. शाहरुखच्या या व्हायरल व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट्स केल्या आहेत.
पाहा व्हिडीओ:
शाहरुख खाननं NMACC च्या उद्घाटन समारंभात 1997 मध्ये आलेल्या 'दिल तो पागल है' या चित्रपटातील 'ले गई ले गई' गाण्यावर तिने जबरदस्त डान्स केला. तसेच त्यानं पठाण या चित्रपटातील झुमे जो पठाण या गाण्यावरही डान्स केला. अभिनेता वरुण धवन आणि रणवीर सिंह यांच्यासोबत शाहरुखनं ब्राऊन मुंडे या गाण्यावर डान्स केला.
'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' हे मुंबईतील वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ सेंटरमध्ये बनवण्यात आलं आहे. हे देशातलं सर्वात मोठं कलाकेंद्र असल्याचं म्हटलं जात आहे. या कल्चरल सेंटरच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जोपासली जाणार आहे.
शाहरुखचे आगामी चित्रपट
शाहरुख लवकरच जवान आणि डंकी या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही महिन्यांपूर्वी शाहरुखचा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटात शाहरुखसोबतच, दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) यांच्यासोबतच डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
NMACC इव्हेंटमध्ये शाहरुख-गौरीचं भांडण? सोशल मीडियावर चर्चेला उधाण; व्हिडीओ व्हायरल