Prashant Damle : मराठी चित्रपट, मालिका आणि नाटक या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या प्रशांत दामले (Prashant Damle) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. ते सोशल मीडियावर आपल्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती चाहत्यांना देतात. प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर एका चाहत्याच्या कमेंटला रिप्लाय दिला आहे. यामध्ये त्यांनी अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यांच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले.
प्रशांत दामले यांनी ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या नाटकाच्या टीम बरोबर एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट्स केल्या. प्रशांत दामले यांच्या एका चेहत्यानं त्यांच्या या फोटोला खास कमेंट केली. या कमेंटला प्रशांत दामले यांनी रिप्लाय दिला.
एका चाहत्यानी प्रशांत दामले यांनी शेअर केलेल्या फोटोला कमेंट केली, 'सेम टू यू. दांबले सर, पुन्हा हा प्रयोग गडकरी रंगायतन ठाणे येथे कधी होईल? वाट पाहतोय.' चाहत्याच्या या कमेंटला प्रशांत दामले यांनी रिप्लाय दिला, 'दांबले हे आवडलं. अशोकमामा मला प्रेमाने अशी हाक मारतो.'
ऐकवे ते नवलच, आयत्या घरात घरोबा’, ‘प्रेमांकुर’, ‘आनंदी आनंद’, सगळीकडे बोंबाबोंब या चित्रपटांमध्ये प्रशांत दामले आणि अशोक सराफ यांनी काम केलं. प्रशांत दामले आणि अशोक सराफ यांनी चाहत्यांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. दोन्ही कलाकांच्या आगामी प्रोजेक्ट्ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.
प्रशांत दामले यांनी या नाटकांमध्ये केलं काम
प्रशांत दामलेंनी 1983 साली 'टूरटूर' या नाटकाच्या माध्यमातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यांनी वेगवेगळ्या नाटकांत भूमिका त्यांनी साकारल्या. प्रशांत दामले यांच्या नकळत दिसले सारे, कार्टी काळजात घुसली, संगीत संशयकल्लोळ, साखर खाल्लेला माणूस आणि एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
अशोक सराफ यांचे चित्रपट
आयत्या घरात घरोबा, आमच्या सारखे आम्हीच,आत्मविश्वास,नवरी मिळे नवऱ्याला,गंमत जंमत आणि अशी ही बनवाबनवी या चित्रपटांमध्ये अशोक सराफ यांनी काम केलं आहे. कोयला, सिंघम, करण अर्जुन यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील अशोक सराफ यांनी काम केलं. अशोक सराफ यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. ‘मी बहुरुपी’ या पुस्तकात अशोक सराफ यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Ashok Saraf: संपूर्ण सभागृह अशोक मामांसमोर नतमस्तक; पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ यांचा सन्मान