Sukhee Box Office Collection Day 1: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) सुखी  (Sukhee) हा चित्रपट शुक्रवारी (22 सप्टेंबर) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.या चित्रपटाची विकी कौशलच्या द ग्रेट इंडियन फॅमिली या चित्रपटाशी बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. शिल्पाच्या सुखी या चित्रपटाच्या ओपनिंग-डेच्या कलेक्शनबाबत जाणून घेऊयात...


शिल्पा शेट्टीचा सुखी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. Sacknilk च्या रिपोर्टनुसार, शिल्पा शेट्टीच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास 30 लाखांची कमाई केली आहे. वीकेंडला हा चित्रपट चांगली कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे.


द ग्रेट इंडियन फॅमिलीने पहिल्याच दिवशी 1.40 कोटी रुपयांची कमाई केली आहे.   शाहरुख खानचा जवान हा चित्रपट  द ग्रेट इंडियन फॅमिली आणि सुखी या  ॉदोन्ही चित्रपटांना टक्कर देत आहे. 'जवान' रिलीज होऊन 2 आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे, तरीही या चित्रपटाच्या कलेक्शनला कोणीही मागे टाकू शकलेले नाही.


सुखी चित्रपटाची स्टार कास्ट


सुखी या चित्रपटाचे दिग्दर्शन सोनाली जोशीने केले आहे. या चित्रपटात शिल्पासोबतच कुशा कपिला, अमित साध, दिलनाज इराणी, किरण कुमार, विनोद नागपाल या  कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.  कुशानं या चित्रपटात सुखीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे.  या चित्रपटात एका 38 वर्षांच्या गृहिणीची कथा आहे.






सुखी (Sukhee) या चित्रपटामध्ये, एक महिला लग्नापूर्वी धाडसी आणि आत्मविश्वासाने आयुष्य जगते, पण लग्नानंतर घर सांभाळणे हे तिचे पहिले कर्तव्य होते.


धडकन, मैं खिलाडी तू अनाडी, बाजीगर या शिल्पाच्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. शिल्पा ही ‘इंडियन पोलीस फोर्स’ या सिरीजमधून शिल्पा शेट्टी डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे.  शिल्पा ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. शिल्पाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. शिल्पाचा काही महिन्यांपूर्वी निकम्मा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता शिल्पाच्या सुखी या चित्रपटाला वीकेंडला प्रेक्षकांची पसंती मिळेल की नाही? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


संबंधित बातम्या:


Sukhee Trailer: 'सुखी' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; शिल्पा शेट्टी आणि कुशा कपिला प्रमुख भूमिकेत