Horror Comedy Movie OTT : चित्रपटाचा टीझर, ट्रेलर रिलीज करण्यासाठी काही हटके प्रयोग चित्रपटाच्या टीमकडून करण्यात येतात. चित्रपटाच्या कथानकानुसार असे प्रयोग ट्रेलर, टीझर लाँचिंगच्या वेळी होतात. एका हॉरर कॉमेडी चित्रपटाचा टीझर चक्क स्मशानभूमीत केला होता. त्यावेळी या उपस्थित असणाऱ्यांचा थरकाप उडाला होता. काहींनी तर लागलीच स्मशानभूमीतील या कार्यक्रमातून काढता पाय घेतला. तर, काहींना त्या रात्री झोपच लागली नसल्याचे म्हटले जाते. 


स्मशानभूमीत टीझर लाँच होणाऱ्या चित्रपटाचे नाव ‘गीतांजली मल्ली वचिंडी’ आहे. बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटीवर स्ट्रीम होत आहे.  या तेलगू चित्रपटाचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते. 


बॉक्स ऑफिसवर किती केली कमाई?


या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. ‘गीतांजली मल्ली वचिंडी’ या चित्रपटाची निर्मिती 4 कोटी रुपयांमध्ये झाली. तर, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जवळपास 10 कोटींची कमाई केली होती. शिवा तुरलापती यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटात अंजली लीड रोलमध्ये आहे. 


या चित्रपटाचा सिक्वेल आहे ‘गीतांजली मल्ली वचिंडी’


‘गीतांजली मल्ली वचिंडी’ हा  वर्ष 2014 मध्ये रिलीज झालेला गीतांजली या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात अंजलीशिवाय, श्रीनिवास रेड्डी, सत्यम राजेश, शकालाका शंकर, ब्रह्मजी, रवी शंकर, राहुल माधव आणि सत्या यांची भूमिका आहे. 


कोणत्या ओटीटीवर रिलीज?


‘गीतांजली मल्ली वचिंडी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडीओवर स्ट्रीम होत आहे. मात्र, हा चित्रपट तेलगू ऑडिओमध्ये ऐकता येईल. तर, इंग्रजीत सबटायटल्स आहेत. या चित्रपटाला आयएमडीबीला 5.7 रेंटिग मिळाली आहे. 


मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?


मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर  प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 28 मे रोजी बहुप्रतिक्षित पंचायत या वेब सीरिजचा तिसरा सीझन रिलीज होणार आहे. प्राईम व्हिडीओवर ही वेब सीरिज पाहता येईल.  रणदीप हुड्डाचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट सिनेमागृहानंतर आता ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. 28 मे रोजीच हा चित्रपट झी 5 ओटीटीवर रिलीज होणार आहे. 


हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेजचा अमेरिकन सायंस फिक्शन अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'एटलस' नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :