Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. देशासह परदेशात शाहरुखचा मोठा चाहतावर्ग आहे. शाहरुखचा प्रत्येक सिनेमा पाहणं ही प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी आहे. पण आता शाहरुखच्या एका जबरा फॅनचा व्हिडीओ समोर आला आहे. शाहरुखसाठी काहीही असं म्हणत 'जवान' पाहायला त्याचा चाहता व्हेंटिलेटरवर असताना थिएटरमध्ये गेला आहे. 


शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा थिएटरमध्येच पाहण्याची त्याच्या चाहत्याची इच्छा होती. आता जवान पाहिल्यानंतर त्याच्या जबरी फॅनने सिनेमाचं, कथानकाचं, दिग्दर्शकाचं आणि शाहरुख खानच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. 'जवान' सिनेमातील अॅक्शन सीन्स खूप आवडल्याचंही अभिनेता म्हणाला. 






शाहरुखच्या 'जवान'ने पार केला 400 कोटींचा टप्पा


सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार,'जवान' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 75 कोटींची दणदणीत कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 53.23 कोटी, तिसऱ्या दिवशी 77.83 कोटी, चौथ्या दिवशी 80.1 कोटी, पाचव्या दिवशी 32.92, सहाव्या दिवशी 26 कोटी, सातव्या दिवशी 23.2 कोटी, आठव्या दिवशी 21.6 कोटी, नवव्या दिवशी 21 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या नऊ दिवसांत या सिनेमाने 400 कोटींचा टप्पा पार करत आतापर्यंत 410.88 कोटींचा गल्ला जमवला आहे.


'जवान'ने रचला इतिहास


शाहरुख खानच्या 'जवान' या सिनेमाने इतिहास रचला आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 700 कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे देशासह परदेशातही अनेक रेकॉर्ड्स या सिनेमाने आपल्या नावावर केले आहेत. शाहरुखच्या 'जवान' या सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची गाडी सुसाट सुटली आहे.


एटली कुमार (Atlee Kumar) दिग्दर्शित 'जवान' हा अॅक्शन आणि थरार-नाट्य असणारा सिनेमा आहे. या सिनेमात शाहरुखसह नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा, प्रियामणी, एजाज खान, सुनील ग्रोवरसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच दीपिका पदुकोण आणि संजय दत्तची झलकही प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस रेकॉर्डब्रेक कमाई करणारा 'जवान' हा सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. आता किंग खानच्या 'डंकी' (Dunky) सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Jawan Box Office Collection : शाहरुखच्या 'जवान'च्या कमाईत दिवसेंदिवस घसरण सुरुच; जाणून घ्या आतापर्यंतचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...