Prakash Raj : काल (14 सप्टेंबर) देशभरात हिंदी दिवस साजरा करण्यात आला. हिंदी दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)  म्हणाले, "जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतातील भाषांच्या विविधतेला एकसंध करणारी हिंदी ही भाषा आहे. स्वातंत्र्य चळवळीपासून ते आजपर्यंत हिंदी भाषेनं  महत्त्वाची भूमिका बजावली आहे."  त्यांच्या या वक्तव्यावर आता ट्वीट शेअर करुन प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया दिली. प्रकाश राज (Prakash Raj) यांच्या ट्वीटला अभिनेत्री कंगना रनौतनं (kangana ranaut) दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


प्रकाश राज यांचे ट्वीट


प्रकाश राज यांनी एक ट्वीट शेअर करुन अमित शाह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'तुम्ही हिंदी भाषेमध्ये बोलता कारण तुम्हाला हिंदी भाषा माहित आहे. तुम्ही आम्हाला हिंदी बोलायला सांगता कारण तुम्हाला फक्त हिंदी माहीत आहे.' या ट्वीटला प्रकाश राज यांनी स्टॉप हिंदी दिवस, स्टॉप हिंदी इम्पोजिशन आणि स्टॉप हिंदी हेगेमोनी हे हॅशटॅग्स दिले आहेत. 






कंगनाच रिप्लाय


प्रकाश राज  यांनी शेअर केलेल्या ट्वीटला कंगनानं रिप्लाय दिला, "अमित शाह जी हे गुजरातचे आहेत आणि त्यांची मातृभाषा देखील गुजराती आहे." कंगनाच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 






प्रकाश राज यांचे चित्रपट


प्रकाश राज हे विविध विषयांवर आधारित असणारे ट्वीट शेअर करत असतात. त्यांच्या ट्वीटची चर्चा सोशल मीडियावर होत असते. त्यांनी वारिसू, केजीएफ, वॉन्टेड या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.   सिंघम या चित्रपटामुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात त्यांनी  जयकांत शिक्रे ही भूमिका साकारली होती.


कंगनाचे चित्रपट


कंगना ही बॉलिवूडची पंगा क्विन म्हणून ओळखली जाते. तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. ती लवकरच  चंद्रमुखी 2,  इमर्जन्सी आणि तेजस  या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Prakash Raj: 'चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करा'; स्वामी चक्रपाणी यांच्या मागणीवर अभिनेते प्रकाश राज यांची प्रतिक्रिया; म्हणाले....