Shah Rukh Khan: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्याच्या पठाण (Pathaan) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची शाहरुखचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता शाहरुखच्या चाहत्यांनी पठाण चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. 


शाहरुख हा चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर कमबॅक आहे. पठाण या शाहरुखच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. शाहरुखचे चाहते आता पठाणच्या 'फर्स्ट डे फर्स्ट शो' ची जय्यत तयारी करत आहेत. रिपोर्टनुसार, शाहरुख खानचे 50000 हून अधिक चाहते 'पठाण'चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणार आहेत. SRK युनिव्हर्स हा शाहरुखचा फॅन क्लब भारतातील 200 हून अधिक शहरांमध्ये 'पठाण'च्या फर्स्ट डे फर्स्ट शोचे आयोजन करणार आहे.


SRK युनिव्हर्स हा फॅन क्लब भारतातील 200 हून अधिक शहरांमध्ये 'पठाण'चा फर्स्ट डे फर्स्ट शो आयोजित करत आहेत. SRK युनिव्हर्स फॅन क्लबचे सह-संस्थापक यश परायणी यांनी सांगितलं, 'SRK युनिव्हर्स 200 हून अधिक शहरांमध्ये 'पठाण' च्या  फर्स्ट डे फर्स्ट शोचे आयोजन करत आहे. यामध्ये 50 हजारांहून अधिक चाहते सहभागी होतील अशी आमची अपेक्षा आहे. याद्वारे आम्ही सुमारे 1 कोटी रुपयांचे बुकिंग करू शकतो. शाहरुखच्या पुनरागमनाचे सेलिब्रेशन फक्त पहिल्या दिवसाच्या शोपुरते मर्यादित नाही, तर प्रजासत्ताक दिनानंतर येणाऱ्या वीकेंडलाही लोकांनी 'पठाण' बुक करणे हाच त्याचा उद्देश असेल.' पठाण या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


''पठाण' हा IMAX फॉरमॅटमध्ये चित्रित झालेला पहिला भारतीय चित्रपट आहे. सर्व शहरांमध्ये आमची बहुतेक बुकिंग IMAX शोसाठी असेल. चाहत्यांची ही तयारी पाहून 'पठाण' मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालेल, असं दिसतंय.', असंही यश परायणी यांनी सांगितलं.


शाहरुखचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झाले आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.  250 कोटींच्या बजेटमध्ये 'पठाण' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Pathaan Trailer: 'हा रणवीर सिंह आहे?'; पठाणचा ट्रेलर रिलीज होताच नेटकऱ्यांना पडला प्रश्न