Urfi Javed: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री  उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या

  चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यामध्ये सोशल मीडिया वॉर सुरु आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या फॅशनवर टीका केली होती. त्यानंतर उर्फीनं चित्रा वाघ यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं होतं. उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे केली होती. आता चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई (Mumbai) पोलिसांनी दखल घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस पाठवली आहे. 


उर्फी जावेदच्या अडचणीव वाढ होऊ शकते. सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस पाठवली आहे. अंबोली पोलीस ठाण्यात उर्फी जावेदची चौकशी होणार आहे. उर्फीला आज हजर होण्याची नोटिस देण्यात आली आहे. चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेतली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. 


चित्रा वाघ या देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन उर्फीच्या फॅशनवर टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी एक ट्वीट शेअर केलं होतं. या ट्वीटमध्ये चित्रा वाघ यांनी लिहिलं होतं, 'मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स आणि किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी मुंबईचे मा. मुंबई पोलीस आयुक्तांची तसेच सहआयुक्त कायदा आणि सुव्यवस्था यांची भेट घेतं मागणी केली.' 


चित्रा वाघ यांनी एका ट्वीटमध्ये लिहिलं होतं, 'तात्काळ बेड्या ठोका हीला एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतीचा शिकार होतात.  तर ही बया अजून विकृती पसरवतीये.' या ट्वीटला उर्फी जावेदनं रिप्लाय दिला होता. उर्फी ट्वीटमध्ये लिहिलं होतं, 'तुमच्यासारखे राजकारणी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा बाजूला ठेवतात. तुम्हाला माझ्याबद्दल बोलून जनतेचं लक्ष वेगळ्या विषयाकडे वळवायचे आहे. ज्या महिलांना मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात काही का करत नाही? महिलांचे शिक्षण, प्रलंबित असलेली बलात्काराची प्रकरणे, याकडे तुम्ही लक्ष का देत नाही?' 


अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Urfi Javed: 'मी पण भाजपमध्ये प्रवेश करते, मग...'; उर्फीनं पुन्हा साधला चित्रा वाघ यांच्यावर निशाणा