Dunki Release : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. 'पठाण' (Pathaan) आणि 'जवान' (Jawan) या बॅक टू बॅक सुपरहिट सिनेमानंतर 'डंकी' या सिनेमाच्या माध्यमातून किंग खान रुपेरी पडदा पुन्हा एकदा गाजवणार आहे. 'डंकी' या सिनेमाचा रिलीजआधीच जगभरात बोलबाला पाहायला मिळत आहे.


शाहरुखच्या 'डंकी' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांनी सांभाळली आहे. राजकुमार हिरानी यांच्यासोबत शाहरुखने पहिल्यांदाच एकत्र काम केलं आहे. हिरानी यांचे 'मुन्नाभाई एमबीबीएस', '3 इडियट्स' आणि 'पीके' असे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. त्यामुळे आता 'डंकी' या सिनेमाकडून सिनेप्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत. 


'डंकी'चा फर्स्ट डे फर्स्ट शो असणार खास (Dunki First Day First Show)


राजकुमार हिरानी आणि शाहरुख खानची जोडी एक छान कलाकृतीच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत आहे. त्यामुळे चांगली कलाकृती पाहण्याची प्रेक्षकांनाही प्रतीक्षा आहे. 'डंकी'चा फर्स्ट डे फर्स्ट शो भारतातील 240 शहरांमध्ये होणार आहे. तर विदेशातील 50 ठिकाणांमध्ये या सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो होणार आहे. वीकेंडला हा आकडा 750 च्या आसपास असू शकतो. शाहरुख खानच्या फॅनक्लबने फर्स्ट डे फर्स्ट शो संदर्भात ट्वीट केलं आहे. 






'डंकी' कधी रिलीज होणार? (Dunki Release Date)


राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' हा सिनेमा 21 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शाहरुख खान (Shah Rukh Khan), तापसी पन्नू (Taapsee Pannu), विकी कौशल (Vicky Kaushal), बोमन ईरानी आणि विक्रम कोचर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 21 डिसेंबरलाच प्रभासचा 'सालार' हा सिनेमाही प्रदर्शित होणार आहे. आता प्रभास आणि शाहरुखमध्ये बॉक्स ऑफिस कोण गाजवणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.


'पठाण' आणि 'जवान'पेक्षा 'डंकी' या सिनेमाचे सर्वाधिक शो ठेवण्यात आले आहेत. जगभरात अॅडव्हान्स बुकिंगमध्ये या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या सिनेमाचे जगभरात 5500 तिकिटे विकले गेले असल्याची माहिती आहे. भारतात लवकरच या सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंग सुरू होईल.


संबंधित बातम्या


Dunki Advance Booking : शाहरुखचा 'डंकी' मोडणार 'पठाण' अन् 'जवान'चा रेकॉर्ड! वर्षाच्या शेवटी बॉक्स ऑफिसवर पडणार पैशांचा पाऊस