Dunki Song Out: दिग्दर्शक राजकुमार हिरानीचा (Rajkumar Hirani) 'डंकी' (Dunki) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला सर्व प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. हा चित्रपट देशातीलच नाही तर परदेशातील प्रेक्षकांची मनं देखील जिंकत आहे. या चित्रपटातील डंकी या चित्रपटातील 'मैं तेरा रास्ता देखूंगा' हे गाणं नुकतेच रिलीज झाले आहे.
शाहरुखनं शेअर केलं गाणं (Dunki Song Out)
शाहरुख खानने ट्विटर अकाऊंटवर 'डंकी' या चित्रपटातील 'मैं तेरा रास्ता देखूंगा' हे गाणं शेअर केलं. त्यानं या गाण्याला कॅप्शन दिलं,"मैं तेरा रास्ता देखूंगा या गाण्यात 'डंकी'चा प्रवास अत्यंत हृदयस्पर्शी भावनांनी मांडला आहे. हार्डीचे मनूसाठी बिनशर्त प्रेम! प्रीतम आणि अमिताभ भट्टाचार्य यांची ही धून हृदयाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचते आणि मंत्रमुग्ध करते.विशाल ददलानी, शादाब फरीदी आणि अल्तमश फरीदी यांचा आवाज. गाण्याटी संपूर्ण कथा जाणून घेण्यासाठी थिएटरमध्ये या… मी तुमची वाट बघतोय!" 'मैं तेरा रास्ता देखूंगा' या गाण्यात हार्डी आणि मनू यांच्यातील चित्रपटात दाखवलेल्या प्रेमाच्या गोडवा दाखवला आहे.
डंकी या चित्रपटातील लुट पूट गया,निकले दी कभी हम घर से,ओ माही आणि बंदा या गाण्यांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. डंकी या चित्रपटातील शाहरुखच्या अभिनयाचं अनेकजण कौतुक करत आहेत.
'डंकी' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'डंकी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 140 कोटींहून अधिक कमाई केली आहे. जगभरात बॉक्स ऑफिसवर डंकी या चित्रपटानं 250 कोटींहून अधिक कमाई केली आहे. डंकी या चित्रपटात शाहरुखसोबतच तापसी पन्नू (Taapsee Pannu), विकी कौशल (Vicky Kaushal) आणि बोमन ईराणी (Boman Irani) यांनी देखील प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
संबंधित बातम्या"
Box Office Collection : शाहरुखचा 'डंकी' की 'प्रभास'चा 'सालार'; बॉक्स ऑफिसवर कोणाची हवा?