Shah Rukh Khan: करण जोहरच्या (Karan Johar) धर्मा प्रोडक्शन या चित्रपट निर्मिती कंपनीच्या माध्यमातून अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली गेली आहे. गेली 25 वर्ष करण हा फिल्ममेकर म्हणून चित्रपटसृष्टीत काम करत आहे. करणचा रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाचा टीझर रिलीज होताच शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) एक खास ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यानं करण जोहरचं कौतुक केलं आहे आणि रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.


शाहरुखचं ट्वीट


शाहरुखनं ट्वीटमध्ये लिहिलं,  ' WOW करण, फिल्ममेकर म्हणून तू गेली 25 वर्षे काम करत आहेस. तू या क्षेत्रात खूप पुढे आला आहेस! तुझे वडील आणि माझे मित्र टॉम अंकल हे स्वर्गातून पाहत असतील आणि त्यांना खूप आनंद आणि अभिमान वाटत असेल. मी तुला नेहमी सांगितलं आहे की, अधिकाधिक चित्रपट तयार करत राहा कारण आपल्याला प्रेमाची जादू हवी आहे… जी फक्त तुच करू शकतो. रॉकी और रानी की प्रेम कहानीचा टीझर खूप छान आहे. चित्रपटाच्या टीमला माझ्याकडून शुभेच्छा'






करण जोहरनं 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'  या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. "रॉकी और रानी की प्रेम काहानी' या माझ्यासाठी अत्यंत खास असणाऱ्या चित्रपटाची काही दृष्ये तुम्हाला दाखवत आहे." असं कॅप्शन करणनं या टीझरला दिलं आहे.


पाहा टीझर








'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंह, अभिनेत्री आलिया भट्ट, जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग, शबाना आझमी हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

 

संबंधित बातम्या



Rocky Aur Rani Ki Prem Kahani : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमाचा टीझर रिलीज; आलिया-रणवीरच्या रोमँटिक केमिस्ट्रीनं जिंकली प्रेक्षकांची मने