Dipika Chikhlia Share Reel: वीएफएक्स, डायलॉग्स आणि कलाकारांचे लूक्स या सर्व गोष्टींमुळे गेल्या काही दिवसांपासून आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटाला ट्रोल केलं जात आहे. हा बिग बजेट चित्रपट 16 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटामधील हनुमानाच्या डायलॉगवर आणि अभिनेता प्रभासच्या (Prabhas) लूकवर नेटकऱ्यांनी सडकून टीका केली. आता आदिपुरुष चित्रपटाच्या या वादादरम्यान रामायण या मालिकेत सीता ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री  दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 


दीपिका चिखलिया यांनी आदिपुरुष चित्रपटातील राम सिया राम या गाण्यावरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल आहे. या व्हिडीओमध्ये त्या माता सीतेच्या लूकमध्ये दिसत आहेत. दीपिका यांच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळ त आहे. अनेक नेटकऱ्यांनी दीपिका यांच्या या व्हिडीओला कमेंट करुन त्यांचे कौतुक केलं आहे. 


नेटकऱ्यांच्या कमेंट्स


दीपिका यांच्या या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली,  'तुमच्यासारखी सीता मातेची भूमिका कोणीही करु शकत नाही' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, तुमचे हे हे रील चित्रपटांपेक्षा चांगले आहे. जय सियाराम' रामायण मालिकेबरोबरच दीपिका यांनी रुपये दस करोड, घर का चिराग आणि खुदाई या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.   


पाहा व्हिडीओ: 






अभिनेता प्रभासनं आदिपुरुष या चित्रपटात प्रभू श्रीरामाची भूमिका साकारली आहे तर अभिनेत्री कृती सेनननं (Kriti Sanon) या चित्रपटात सीता ही भूमिका साकारली आहे. ओम राऊतनं (Om Raut) आदिपुरुष या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आदिपुरुष हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. या चित्रपटात अभिनेता देवदत्त नागेनं हनुमानाची भूमिका साकारली आहे आणि सनी सिंहनं लक्ष्मण ही भूमिका साकारली आहे. सैफ अली खान, तेजस्विनी पंडितनं देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Adipurush: 'जाणूनबुजून तो डायलॉग...'; 'आदिपुरुष'मधील हनुमानाच्या डायलॉगला नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर लेखकानं दिली प्रतिक्रिया