Shah Rukh Khan:  अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. शाहरुखनं अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे . 21 वर्षांपूर्वी त्याचा एक आयकॉनिक चित्रपट रिलीज झाला होता,तो चित्रपट आजही लोक आवडीनं बघतात. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ तर घातलाच पण  5 राष्ट्रीय पुरस्कारही जिंकले. 'देवदास' (Devdas) असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाची ऑफर 5 स्टार्सना देण्यात आली  होती,  पण या सर्वांनी कोणत्या ना कोणत्या कारणाने तो नाकारला.  कोणत्या स्टार्सनी हा सिनेमा नाकारला होता? जाणून घेऊया...


20 कोटींचा सेट अन् 15 लाखांचा लेहेंगा


'देवदास' हा चित्रपट 2002 मधला बिग बॉजेट चित्रपट होता. यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटाच्या सेटवर 20 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. माधुरी दीक्षितचा लेहेंगा 15 लाखांचा होता आणि ऐश्वर्या रॉय बच्चनसाठी 600 साड्यांची व्यवस्था करण्यात आली होती.


'या' कलाकारांनी चित्रपटाला दिला नकार


संजय लीला भन्साळी यांनी सलमान खानला  'देवदास' या चित्रपटाची ऑफर दिली होती.  पण त्यानी ही ऑफर नाकारली. जॅकी श्रॉफच्या आधी गोविंदा, मनोज बाजपेयी आणि सैफ अली खान यांना चित्रपटातील चुन्नीलालची भूमिका ऑफर करण्यात आली होती, परंतु ही ऑफर त्यांनी नाकारली. चित्रपटात माधुरी दीक्षितनं चंद्रमुखीची भूमिका साकारली होती, मात्र यासाठी पहिली पसंती सुष्मिता सेन होती. कामाच्या कमिटमेंटमुळे ती या चित्रपटाचा भाग होऊ शकली नाही, असे म्हटले जात आहे.


'देवदास' चा बॉक्स ऑफिसवर पाच पुरस्कारांवर कोरलं नाव


सलमान खानने नकार दिल्यानंतर शाहरुख खानला 'देवदास'ची ऑफर आली. त्याने या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. रिलीजनंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 'देवदास' चित्रपटानं जगभरात 90 कोटींची कमाई केली.या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मनोरंजन देणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक महिला, सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइन, सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइन आणि सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.


शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. लवकरच त्याचा डंकी हा चित्रपट रिलीज होणार आहे.


संंबंधित बातम्या:


Ask SRK Session: नेटकरी म्हणाला, "मी माझ्या 4 बायकांना 24 मुलांना आणि 50 शेजाऱ्यांना डंकी बघू देणार नाही!"; किंग खाननं रिप्लाय दिला, "भावा तू तसंही..."