Aamir Khan On Mahabharat : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा त्याच्या 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chadhha)या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये आमिरसोबतच अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. सध्या आमिर लाल सिंह चड्ढा या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.  एका मुलाखतीमध्ये आमिरला महाभारतावर (Mahabharat) आधारित चित्रपटाबाबत विचारण्यात आलं. यावर आमिरनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं. 


आमिरला वाटते भीती 
एका मुलाखतीमध्ये आमिरनं सांगितलं की,  महाभारतावर चित्रपट बनवायला मी घाबरतो. कारण हा केवळ चित्रपटनसून माझ्यासाठी बरंच काही आहे. हा चित्रपट नसून एक यज्ञ आहे, जो तुम्हाला कधीही निराश करू शकत नाही, परंतु तुम्ही निराश करू शकता. हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मला हा प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे. पण माझं हे स्वप्न आहे जे पूर्ण करायला मला जवळपास वीस वर्ष लागतील. तसेच जवळपास पाच वर्ष माझी या विषयावरील पुस्तके वाचण्यात जातील. त्यामुळे मला हा प्रोजेक्ट करायला भीती वाटते. 


'लाल सिंह चड्ढा' च्या निर्मितीसाठी लागले 14 वर्ष 
हार्ट टू हार्ट या एबीपी माझ्याच्या मुलाखतीमध्ये आमिरनं सांगितलं की लाल सिंह चड्ढा हा चित्रपट तयार करण्यासाठी 14 वर्ष लागतील. यामधील आठ ते नऊ वर्ष  हे चित्रपटाचे राइट्स मिळवण्यासाठी लागली, असंही आमिरनं सांगितलं. 


लाल सिंह चड्ढा हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव, वायकॉम 18  स्टडियोज  यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ची टक्कर आणि आमिरच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. या दोन्हीही चित्रपटांना  बायकॉट करण्याची मागणी सोशल मीडियावर नेटकरी करत होते. त्यामुळे आता या दोन्हीपैकी कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळेल? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल. 


वाचा इतर बातम्या: