Sohail Khan, Seema Sajdeh : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोहेल खान (Sohail Khan) आणि सीमा सजदेह (Seema Sajdeh) हे लवकरच घटस्फोट घेणार आहेत. सोहेल आणि सीमा यांनी लग्नाच्या 24 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. नुकताच त्यांचा फॅमिली कोर्टाच्याबाहेरील फोटो व्हायरल झाला होता. एका मुलाखतीमध्ये सीमानं घटस्फोटाबाबत सांगितलं आहे. सीमानं मुलाखतीमध्ये तिच्या हा निर्णय घेण्यामागील कारण देखील सांगितलं.
काय म्हणाली सीमा?
एका मुलाखतीमध्ये सीमानं सोहेलसोबत घटस्फोट घेण्याच्या निर्णयाबाबत सांगितलं. ती म्हणाली, 'मी आता माझ्या आयुष्यातील अशा टप्प्यावर पोहोचलो आहे की मला कोणाचीही पर्वा नाही. मला आयुष्यात पुढे जायचे आहे, म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. माझ्या मुलांना आणि कुटुंबाला माझ्या या निर्णयाबाबत माहित आहे. मी माझ्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहे हे माझ्या कुटुंबाला माहित आहे. मी सर्व नकारात्मकता माझ्या आयुष्यातून काढली आहे. मी कोण आहे हे माझ्या जवळच्या लोकांना माहीत आहे.' सीमाने सोशल मीडियावरील तिच्या अकाऊंटचे नाव बदलून सीमा किरण सजदेह ठेवले आहे.
सीमा आणि सोहेलची लव्ह-स्टोरी
सीमा ही फॅशन डिझाइनर आहे. सीमाचे एक फॅशन स्टोर देखील आहे. या फॅशन स्टोरचे नाव 'बांद्रा 190' असं आहे. सोहेलनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ' प्यार किया तो डरना क्या' या चित्रपटाच्या सेटवर सोहेल आणि सीमा यांची भेट झाली. 1998 मध्ये त्यांचा विवाह सोहळा पार पडला. त्यांना निर्वाण आणि योहन नावाची दोन मुलं आहेत. रिपोर्टनुसार, ते दोघे 2017 पासून वेगळे राहात होते. द फॅब्युलस लाइफ्स ऑफ बॉलीवूड वाइफ या शोमध्ये असं दाखवण्यात आलं होतं की दोघे वेगवेगळे राहतात आणि त्यांची मुलं त्यांच्यासोबत राहतात. त्या शोमुळे दोघे वेगवेगळे राहतात, याबाबत चाहत्यांना माहिती मिळाली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या: