Sohail Khan-Seema Khan Divorce : बॉलिवूड अभिनेता सोहेल खान (Sohail Khan) आणि सीमा खान (Seema Khan) यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे, असे म्हटले जात आहे. सोहेल आणि सीमा यांच्या लग्नाला 24 वर्ष पूर्ण झाली आहेत. 'द फॅब्युलस लाइफ्स ऑफ बॉलीवूड वाइव्ह' या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी वेगळं राहत असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. पण तरीही अनेकदा ते एकमेकांना समर्पित पोस्ट शेअर करत असतात.
सोहेल आणि सीमा दोघांनीही 2020 मध्ये एकमेकांसाठीची शेवटची पोस्ट लिहिली आहे. सोहेलने सीमाच्या 'द फॅब्युलस लाइफ्स ऑफ बॉलीवूड वाइव्ह' या कार्यक्रमाची शेवटची पोस्ट शेअर करत तिला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच त्याने नेटफ्लिक्सच्या एका सीरिजचा ट्रेलरदेखील शेअर केला होता. त्याने लिहिले होते, बॉलिवूडप्रमाणे आमच्या आयुष्यातही ड्रामा आणि मसाला आहे."
सोहेल आणि सीमा 1998 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यांना निर्वाण आणि योहन ही दोन मुले आहेत. पण 2017 पासून दोघे वेगळे राहतात, असे म्हटले जाते. अद्याप सोहेल आणि सीमा यांनी घटस्फोटासंदर्भात कोणतेही अधिकृत घोषणा केलेली नाही. सोहेलच्या भावाचा म्हणजेच अरबाज खानचादेखील याआधी घटस्फोट झाला आहे.
नुकताच सोहेल आणि सीमाचा फॅमिली कोर्टाच्याबाहेरील फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे लवकरच ते विभक्त होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या घटस्फोटामुळे त्यांचे चाहते मात्र नाराज होणार आहेत. 'द फॅब्युलस लाइफ्स ऑफ बॉलीवूड वाइव्ह' या शोमध्ये असं दाखवण्यात आलं होतं की, सोहेल आणि सीमा दोघे वेगवेगळे राहतात आणि त्यांची मुलं त्यांच्यासोबत राहतात.
सीमा एक फॅशन डिझाइनर असून 'बांद्रा 190' नावाचे तिचे फॅशन स्टोर आहे. तसेच सोहेलनं अनेक सिनेमांत काम केलं आहे. ट्यूबलाइट, जय हो, राधे, वीर, प्यार किया तो डरना क्या, आणि हॅलो या सिनेमांत सोहेल मुख्य भूमिकेत होता. सोहेल, अरबाज आणि सलमान हे तिघेही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. त्यांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. 'मैंने दिल तुझको दिया' या सिनेमाच्या माध्यमातून सोहेलने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.
संबंधित बातम्या