Ketaki Chitale : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) तिच्या अभिनयापेक्षा वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या चर्चेत आहे. केतकी आणि वाद हे एक समीकरण झालं आहे. काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी घरी आलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातली होती. अशातच आता तिने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या एका वक्तव्यावर खास पोस्ट शेअर करत टीका केली आहे. 


मनोज जरांगे काय म्हणाले? 


केतकी चितळेने मनोज जरांगे यांच्या वक्तव्याचा एक फोटो शेअर केला आहे. यात माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले आहेत,"धनगर आणि मुस्लीम बांधवांनी मागणी केल्यास त्यांच्याही आरक्षणासाठी मी लढा देईल. मग बघतो सरकार कसं आरक्षण देत नाही त्यांना". 


केतकी चितळेची मनोज जरांगेंवर टीका


मनोज जरांगेंच्या वक्तव्याचा फोटो शेअर करत केतकीने (Ketaki Chitale on Manoj Jarange) लिहिलं आहे,"आता कसे, खरे रुप दिसले. मुखवटा फार काळ टिकत नाही. यांना फूट पाडायची आहे सनातनींमध्ये. आता तरी जागे व्हा". पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने (Marathi Actress) #UNIFORMCRIMINALLAW दिलं आहे. केतकीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.



केतकी चितळे नेटकऱ्यांकडून ट्रोल


केतकी चितळे काही दिवसांपूर्वी नेटकऱ्यांकडून ट्रोल झाली होती. मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी घरी आलेल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारत ती म्हणाली होती,"तुम्ही मराठा म्हणजे माझ्यावर अ‍ॅट्रॉसिटी टाकणार नाहीत. मी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहे. संविधान आणि कायदा सर्वांसाठी समान नाही. जातींवर आधारित कायदे बनवले जात आहेत". मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे केतकी चांगलीच ट्रोल झाली होती.  






केतकी चितळेबद्दल जाणून घ्या (Who is Ketaki Chitale)


केतकी चितळेकडे सध्या कोणताही सिनेमा किंवा मालिका नाही. मनोरंजनसृष्टीपासून सध्या ती दूर आहे. पण तरीही वादग्रस्त वक्तव्यामुळे ती चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. आंबट गोड, तुझं माझं ब्रेकअप अशा लोकप्रिय मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 'सास बिना ससुराल' या हिंदी मालिकेतही तिने काम केलं आहे.



संबंधित बातम्या


Ketaki Chitale : "मी चित्पावन ब्राह्मण, संविधानामुळे जातींमध्ये भेदभाव"; वादग्रस्त वक्तव्य आणि कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्यानंतर केतकी चितळे नेटकऱ्यांकडून ट्रोल