Saudi Prince Salman : जगातील सर्वात श्रीमंत राजकुमारांपैकी एक असलेला सौदीचा क्राऊन प्रिन्स (Saudi Prince Salman) अर्थात मोहम्मद बिन सलमान (Mohammed Bin Salman) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता सौदीच्या क्राऊन प्रिन्ससंदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे. त्याने लोकप्रिय हॉलिवूड अभिनेत्री किम कर्दाशियां (Kim Kardashian) हिला एक रात्र घालवण्यासाठी 64 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. अभिनेत्रीला 64 कोटींची ऑफर देणाऱ्या मोहम्मद बिन सलमानला संपत्ती, महागड्या कार, घड्याळ, कपडे आणि प्राण्यांचीदेखील आवड आहे.
मोहम्मद बिन सलमानचा समावेश आज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये केला जातो. आपल्या श्रीमंतीसह तो वादग्रस्त वक्तव्यामुळेदेखील अनेकदा चर्चेत असतो. हॉलिवूड अभिनेत्री किम कर्दाशियां (Kim Kardashian) हिला एक रात्र घालवण्यासाठी मोहम्मद बिन सलमानने 64 कोटी रुपयांची ऑफर दिली होती.
हॉलिवूड अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यासाठी दिलेली 64 कोटी रुपयांची ऑफर (Saudi Prince Salman Offer 10 Million Dollor to Hollywood Actress)
मोहम्मद बिन सलमानने 2014 मध्ये हॉलिवूड अभिनेत्री किम कर्दाशियांला (Kim Kardashian) एक रात्र घालवण्यासाठी 64 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. त्यामुळे त्याकाळी तो चांगलाच चर्चेत आला होता. अमेरिकेतील वृत्तवाहिन्यांमध्ये मोहम्मदचे हे वृत्त दाखवले जात होते. किमच्या पतीने 2016 मध्ये एक ट्वीट केलं होतं की,"आपल्यावर 53 कोटी रुपयांचे कर्ज आहे. तसेच कोणीही मदत करायला तयार नाही. पत्नीला एक रात्र घालवण्यासाठी 65 कोटींची मिळालेली ऑफरदेखील तिने नाकारली". पतीच्या या ट्वीटनंतर किमने मात्र काहीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मोहम्मद बिन सलमान नेहमीच काही ना काही हटके करण्याचा प्रयत्न करत असतो. मालदीवमधील वाढदिवसाच्या पार्टीत त्याने एका रात्रीत 56 कोटी रुपये खर्च केले होते. ज्यामध्ये जेनिफर लोपेझ पिटबुल यांच्यासह अनेक देशांतील राजकुमार उपस्थित होते. याव्यतिरिक्त, मोहम्मद बिन सलमानने अलीकडेच 360 कोटी रुपये किंमतीची नौका खरेदी केली आहे.
मोहम्मद बिन सलमानबद्दल जाणून घ्या.. (Who is Mohanned Bin Salman)
मोहम्मद बिन सलमानचा जन्म 31 ऑगस्ट 1985 मध्ये झाला आहे. मोहम्मद बिन सलमान सौदी अरेबियाचा क्राऊन प्रिन्स आहे. मोहम्मदच्या वडिलांचे नाव सलमान बिन अब्दुलअजीझ असून आईचे नाव फहदा बिंत फलाह अल हिथलेन असं आहे. सौदी विद्यापीठामधून त्याने कायद्याची पदवी मिळवली आहे. सौदीमध्ये त्याने अनेक सामाजिक आणि आर्थिक सुधारणा केल्या आहेत. हुकुमशाही सरकारचं तो नेतृत्व करतो.
संबंधित बातम्या