Satish Kaushik Death: बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक  सतीश कौशिक (Satish Kaushik) निधन झाले. मुंबईमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सतीश यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आता सतीश यांची 10 वर्षांची मुलगी वंशिका कौशिक हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. हा फोटो पाहिल्यानंतर अनेक नेटकरी भावूक झाले. 


वंशिकाने शेअर केला सतीश यांच्यासोबतचा फोटो 


सतीश कौशिक यांच्या निधनानंतर वंशिकाने वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये मुलगी आणि वडील यांच्यामधील बाँडिंग दिसत आहे. फोटोमध्ये वंशिका आणि सतीश यांच्या दोघांच्या चेहऱ्यावर स्माईल दिसत आहे. वंशिकाने शेअर केलेल्या फोटोमधील सतीश आणि वंशिकाच्या बाँडिग पाहून नेटकरी भावूक झाले. 






1985 मध्ये सतीश कौशिक यांनी शशी कौशिक यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर शशी आणि सतीश यांच्या आयुष्यात चिमुकल्याचं आगमन झालं. त्यांनी आपल्या मुलाचं नाव शानू असं ठेवलं. शानूच्या जन्मानंतर सतीश हे कुटुंबासोबत वेळ घालवत होते. पण सतीश यांचा मुलगा शानूचं वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी निधन झाले. 2012 मध्ये सतीश आणि शशी हे सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाले. त्यांनी आपल्या मुलीचं नाव वंशिका असं ठेवलं. 


सतीश कौशिक यांच्या अंत्यदर्शनला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. जावेद अख्तर, फरहान अख्तर, अर्जुन कपूर, राकेश रोशन, शहनाज गिल, सलमान खान, अभिषेक बच्चन, शिल्पा शेट्टी, अर्जुन कपूर, रणबीर कपूर, जॉनी लीवर, चंकी पांडे हे सेलिब्रिटी सतीश कौशिक यांच्या अंत्यदर्शनालासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. 


सतीश कौशिक यांचे चित्रपट


सतीश कौशिक हे अभिनेता, कॉमेडियन, स्क्रिप्ट रायटर, दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. 1987 मध्ये रिलीज झालेल्या मिस्टर इंडिया चित्रपटामुळे त्यांनी विशेष ओळख मिळाली. या चित्रपटात त्यांनी कॅलेंडर ही भूमिका साकारली. तसेच दीवाना मस्ताना, राम लखन आणि साजन चले ससुराल या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Satish Kaushik Family: मुलाच्या निधनानं खचले होते सतीश कौशिक; 56 व्या वर्षी पुन्हा बाप होण्याची इच्छा पूर्ण