Sara Ali Khan Travels In Metro: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानला (Sara Ali Khan) प्रवासाची खूप आवड आहे. ती अनेकदा तिच्या कामातून ब्रेक घेऊन विविध ठिकाणी ट्रीपला जात असते.सारा ही सोशल मीडियावर तिच्या ट्रीपचे फोटो शेअर करत असते. सध्या साराचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ती मुंबई मेट्रोमधून (Mumbai Metro) प्रवास करताना दिसत आहे. सारा अली खानने  तिचा मेट्रोमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करुन खास कॅप्शन दिलं आहे.


साराने शेअर केला फोटो 


सारा अली खानने सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती मुंबई मेट्रोमधून प्रवास करताना दिसत आहे. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'मुंबई मेरी जान' तसेच पुढे कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, 'आदित्य रॉय कपूर आणि अनुराग बासू यांच्या आधी मी मुंबई मेट्रोमधून प्रवास करेल, याचा मी विचार केला नव्हता. ' 


मेट्रो इन दिनों चित्रपटात सारा करणार काम


सारा अली खान मेट्रो इन दिनों या चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. अनुराग बासू या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. सारा आणि आदित्य व्यतिरिक्त या चित्रपटात अनुपम खेर, फातिमा सना शेख, अली फजल, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा आणि नीता गुप्ता हे कलाकार देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. 






 सारा अली खानचे आगामी चित्रपट


 सारा अली खान आणि आदित्य रॉय कपूर यांचा मेट्रो इन दिनों हा चित्रपट 8 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. याशिवाय सारा अली खान ही ए वतन मेरे वतन या चित्रपटामधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर  रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता विक्रांत मॅसी देखील काम करणार आहे.साराच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Ae Watan Mere Watan: सारा अली खान साकारणार महिला स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका; पाहा 'ऐ वतन मेरे वतन' मधील लूक