Sara Ali Khan: अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. सारा ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. सध्या साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सारा फोटोग्राफर्समुळे वैतागलेली दिसत आहे. 


साराच्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, ती एका रेस्टॉरंटमध्ये जात आहे. तेवढ्यात तिथे असणारे फोटोग्राफर्स साराचं नाव घेऊन ओरडू लागतात. सारा फोटोसाठी पोज देते. त्यानंतर रेस्टॉरंटच्या आत सारा जाणार, तितक्यात पुन्हा फोटोग्राफर्स ओरडू लागतात. सारा मागे वळून फोटोग्राफर्सला सांगेत, 'ओरडू नका! रेस्टॉरंटमधले लोक बघत आहेत.' साराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


नेटकऱ्यांच्या कमेंट्स


सारा या व्हायरल व्हिडीओमध्ये कुर्ता, कानात झुमके आणि बांगड्या अशा लूकमध्ये दिसत आहे. साराच्या या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'ती खूप नम्र आहे. तिला अजिबात अहंकार नाहीये.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'सारा ही तिच्या आईसारखी दिसते.'


पाहा व्हिडीओ:






साराचे चित्रपट


साराचा काही दिवसांपूर्वी 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke Zara Bachke) हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. सारासोबतच या चित्रपटात विकी कौशल, राकेश बेदी, शारीब हाश्मी, नीरज सूद या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. आता साराच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अतरंगी रे, केदारनाथ, लव्ह आज कल, कुली नंबर 1, गॅसलाइट या चित्रपटांमधील साराच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. सारा ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. सारा ही तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती सोशल मीडियाच्या माध्यामातून देते. 


सारा ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकवेळा चर्चेत असते. सारा आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या नात्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सुरु होती. पण सारा आणि कार्तिक यांनी त्यांच्या नात्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. सध्या साराचं नाव क्रिकेटर शुभमन गिलसोबत जोडलं जात आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Sara Ali Khan: 'हर हर महादेव',सारा अली खाननं घेतलं उज्जैनच्या महाकाल देवाचं दर्शन; पाहा व्हिडीओ