Rakhi Sawant : बॉलिवूडची 'ड्रामाक्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी तिने टोमॅटोच्या (Tomato) भाव वाढीवर नाराजी व्यक्त केली असून शेती करणार असल्याचं जाहीर केलं होतं. आता राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राखी टोमॅटोचं झाड लावताना दिसत आहे.


राखीच्या झाडाला 15 दिवसांत येणार टोमॅटो


विरल भयानीने सोशल मीडियावर राखी सावंतचे दोन व्हिडीओ (Rakhi Sawant Viral Video) शेअर केले आहेत. एका व्हिडीओमध्ये ड्रामाक्वीन राखी सावंत म्हणत आहे,"मित्रांनो, मी टोमॅटोचं झाड लावत आहे".  राखीने माळीच्या मदतीने टोमॅटोचं झाड लावलं आहे. त्यावर समोर बसलेला पापराझी म्हणतो की,"या झाडाला किती दिवसांत टोमॅटो येतील?". त्यावर राखी त्या माळीला विचारते,"किती दिवसांत टोमॅटो येतील?". माळी म्हणतो,"15 दिवस". त्यावर पापराझीला उत्तर देत राखी म्हणत आहे,"15 दिवसांत माझ्या झाडाला टोमॅटो येतील". 






विरल भयानीने राखीचा आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणत आहे,"मी क्रांतीकारी नाही.. टोमॅटोकारी आहे. आज मी स्वत: माझ्यासाठी टोमॅटोचं झाड लावलं आहे. 15 दिवसांत या झाडाला टोमॅटो येणार आहेत. या झाडाला येणारे टोमॅटो मी पुढील सात जन्म खाणार आहे".


राखीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव (Rakhi Sawant Video Viral)


राखीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. फक्त प्रसिद्धीसाठी राखी शेती करत आहे, 15 दिवसांत टोमॅटोचा भाव कमी होईल, लोकप्रियतेसाठी काय काय करावं लागतं ड्रामाक्वीनला, आधी कृषीविषयक अभ्यास कर मग शेती कर, राखेचे टोमॅटो, राखी आता टोमॅटो विकणार, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 


राखी सावंतने याआधीदेखील टोमॅटोच्या भाव (Rakhi Sawant On Tomato Price) वाढीबद्दल भाष्य केलं होतं. ती म्हणाली होती,"टोमॅटो ही महाग करण्याची गोष्ट आहे का? आता मी चटणी कशी बनवणार? माझं टोमॅटोचं सॅलेड कसं बनवणार? राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल झाला होता. 


संबंधित बातम्या


Rakhi Sawant : टोमॅटो महाग झाल्याने राखी सावंत चिंतेत; म्हणाली,"आता मी चटणी कशी बनवणार?"