OTT Debut 2024 : रुपेरी पडद्याप्रमाणे ओटीटी विश्वाचीदेखील सिनेरसिकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. अनेक बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी आता ओटीटीवरील सिनेमांत (Movies) आणि वेबसीरिजमध्ये (Web Series) काम करण्यासाठी उत्सुक आहेत. गेल्या वर्षी करीना कपूर ते अजय देवगनपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी ओटीटीवर आपला जलवा दाखवला आहे. 2024 मध्ये अनेक कलाकार तुमचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. बॉलिवूड अभिनेत्रींसाठी 2024 हे वर्ष खूपच खास आहे. या वर्षात अनेक अभिनेत्री ओटीटीवर पदार्पण करणार आहेत. 


सारा अली खान (Sara Ali Khan)


सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची लेक सारा अली खानचा आगामी सिनेमा 'ऐ वतन मेरे वतन' 21 मार्च 2024 रोजी ओटीटीवर रिलीज होणार आहे. प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येईल. या सिनेमात साराचा एक वेगळाच अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu)


समंथा रुथ प्रभूने 'सिटाडेल' या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केलं आहे. समंथाची ही सीरिज प्राईम व्हिडीओवर 2024 मध्य रिलीज होऊ शकते. समंथासह या सीरिजमध्ये वरुण धवन मुख्य भूमिकेत आहेत. राज एंड डीके यांनी या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.


ऊर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar)


'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकर काही दिवसांपासून मनोरंजनसृष्टीपासून दूर आहे. 'तिवारी' या वेबसीरिजच्या माध्यमातून कमबॅक करण्यासाठी आता ती सज्ज आहे. सौरभ वर्मा या सीरिजचं दिग्दर्शन करणार आहे. आई-मुलीच्या नात्यावर भाष्य करणारी ही सीरिज आहे. 


कृती सेनन (Kriti Sanon)


'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या सिनेमातील कृती सेननच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं आहे. आता 'दो पत्ती' या कलाकृतीच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी कृती सज्ज आहे. ती या सिनेमाची निर्मितीदेखील करत आहे. कृतीसह कालोजदेखील या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहे.


अनुष्का शर्मा (Anushka Sharma)


'झीरो'नंतर अनुष्का शर्मा सिनेसृष्टीपासून दूर आहे. 2022 मध्ये काला या सिनेमात अनुष्काची झलक पाहायला मिळली. आता चकदा एक्सप्रेस या सिनेमाच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्यासाठी अनुष्का शर्मा सज्ज आहे. क्रिकेटर झूलन गोस्वामी यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे.


वाणी कपूर (Vaani Kapoor)


मंडालाला मर्डर्स या सीरिजच्या माध्यमातून वाणी कपूर ओटीटीवर पदार्पण करणार आहे. गोपी पुथरन यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. यशराज फिल्म्सने या सीरिजची निर्मिती केली आहे.


संबंधित बातम्या


Rakul Preet Singh Jackky Bhagnani Wedding : रकुल प्रीत सिंह अन् जॅकी भगनानी लग्नाआधी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला; नेटकरी म्हणाले,"जोडी नंबर वन", पाहा व्हिडीओ