Rakul Preet Singh Jackky Bhagnani Wedding : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) आणि जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता आहे. लग्नाआधी जोडप्याने सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे. बाप्पाचा आशीर्वाद घेतानाचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी 21 फेब्रुवारी 2024 रोजी गोव्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकताच मुंबईत त्यांचा प्री-वेडिंग कार्यक्रम पार पडला. लग्नाआधी रकुल आणि जॅकीने सिद्धिविनायक मंदिरात जात बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. 


रकुल-जॅकी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला 


रकुल आणि जॅकी यांचे सिद्धिविनायक मंदिर परिसरातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. लग्नाआधी रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानीने बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. तसेच पुढील आयुष्यासाठी आशीर्वाद घेतले आहेत. रकुलने खास ड्रेस परिधान केला असून जॅकीनेदेखील खास कुर्ता परिधान केला होता.  दरम्यान त्यांनी पापराझींना खास फोटोसाठी पोज दिल्या. फोटोमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.  






रकुल प्रीत सिंह गोव्यात अडकणार लग्नबंधनात


रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांचा लग्नसोहळा 21 फेब्रुवारी 2024 रोजी गोव्यात होणार आहे. गोव्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये ते लग्नबंधनात अडकणार आहेत. रकुल आणि जॅकी यांनी आधी परदेशात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भारतात लग्न करण्याचा सल्ला दिला. तरुण तहलानी, शांतनु आणि निखिल, फाल्गुनी शेन पिकॉर, कुणाल रावल आणि अर्पिता मेहता यांनी डिझाईन केलेला आऊटफिट रकुल लग्नात परिधान करणार आहे.


अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये आपल्या नात्याबाबत खुलासा केला होता. दोघेही एकत्र असल्याची त्यांनी सोशल मीडियावरुन अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर रकुल आणि जॅकी अनेक पार्ट्यांमध्ये आणि इव्हेंट्समध्ये एकत्रित पाहायला मिळाले आहेत. आता दोघेही  21 फेब्रुवारी 2024 रोजी गोव्यात लग्नबंधनात अडकणार आहेत.  


संबंधित बातम्या


Rakul Preet Singh and Jackky Bhagnani : 'या' आलिशान हॉटेलमध्ये रकूल प्रीत आणि जॅकी भगनानी लग्नाच्या बेडीत अडकणार; असं आहे नियोजन