Sara Ali Khan on working with Amrita Singh : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खानच्या  (Sara Ali Khan) अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. साराने गेल्या तीन वर्षात चार चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच तिचा अतरंगी रे  (Atrangi Re) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एका मुलाखतीमध्ये साराने आई अमृता सिंह यांच्यासोबत काम न करण्याचे कारण सांगितले आहे. 


साराने मुलाखतीमध्ये सांगितले, 'मला नाही वाटत की मी आईसोबत काम करू शकते. कारण शूटिंगमध्ये शॉट दरम्यान जर माझे केस चेहऱ्यावर आले तर ती लगेच शॉट कट करून माझे केस निट करने.  मी तिची मुलगी आहे, त्यामुळे तिला असं वाटतं की मी नेहमी बेस्ट दिसायला पाहिजे. मला अजिबात असं वाटतं नाही की मी तिला अशा सिच्युएशनमध्ये टाकावे.' 


जाहिरातीमध्ये केले होते एकत्र काम 
सारा आणि अमृता सिंह यांनी चित्रपटामध्ये कधी एकत्र काम केले नाही पण त्यांनी एका जाहिरातीमध्ये एकत्र काम केले आहे. अमृता सिंह यांच्या बेताब, मर्द, चमेली की शादी  आणि  नाम या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. 



 


साराचा अतरंगी रे हा चित्रपट  24 डिसेंबर 2021 रोजी ओटीटीवर प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सारासोबत अभिनेता अक्षय कुमार आणि धुनष हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.


हे ही वाचा