Bigg Boss 15 Rakhi Sawant : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो बिग बॉस सध्या चर्चेत आहे. या शोचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) करतो. बिग बॉसचा सध्या 15 वा सिझन सुरू आहे. या सिझनमध्ये काही स्पर्धकांनी भाग घेतला आहे. बिग बॉसच्या मागील सिझनमुळे म्हणजेच बिग बॉस-14 मुळे अभिनेत्री राखी सावंतला (Rakhi Sawant) विशेष लोकप्रियता मिळाली होती. बिग बॉस-15  (Bigg Boss 15)  मध्ये देखील राखीने एन्ट्री घेतली आहे. नुकतीच शोमध्ये राखीने तिच्या चाहत्यांना एक माहिती दिली आहे. तिचे 16 दात खोटे असल्याचे तिने या शोमध्ये सांगितले आहे.  तिने या दातांची किंमत देखील सांगितली आहे. 
 
बिस बॉसच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये राखीने तिच्या खोट्या दातांबद्दल माहिती दिली. तिने सांगितले,  तिचे 16 दात खोटे आहे. त्या दातांची किंमत 16 लाख रूपये आहे. म्हणजेच एका दाताची किंमत 1 लाख रूपये आहे.  राखीची ही गोष्ट ऐकून घरातील स्पर्धक तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) थक्क झाली. 






राखीची संपत्ती
न्यू क्रेबने दिलेल्या माहितीनुसार, राखी सावंतकडे 37 कोटी रुपयांची संपत्ती आहे. राखीकडे मुंबईत दोन प्लॅट आणि एक बंगला आहे. ज्याची किंमत 11 कोटी रुपये आहे. राखीकडे 21.6 लाख रुपयांची एक फोर्ड कार आहे. राखीची सर्वाधिक कमाई स्टेज परफॉर्मेंसमधून होते. याव्यतिरिक्त ती भोजपुरी चित्रपटांमध्ये आयटम नंबरही करते. तसेच तिने अनेक बिजनेसमध्ये इन्वेस्टही केलं आहे.


संबंधित बातम्या


Ankita Lokhande Wedding : लग्नपत्रिका झळकली! अंकिता-विकी 'या' ठिकाणी घेणार सात फेरे


Marathi movie Jhimma : झिम्माचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; दोन आठवड्यांमध्ये सहा कोटींची कमाई