मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या आगामी बहुप्रतीक्षित ‘भूमी’ सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे. संजय दत्तच्या वाढदिवशी म्हणजेच 29 जुलैला पोस्टर रिलीज करण्यात आलं.

अभिनेता संजय दत्त आणि दिग्दर्शक उमंग कुमार यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन पोस्टर रिलीज केलं. ‘बाबा इज बॅक’ या हॅशटॅगसोबत हे पोस्टर पोस्ट करण्यात आले आहे.

https://twitter.com/duttsanjay/status/891176242770173952

‘भूमी’मध्ये संजय दत्त अगदी हटके भूमिकेत दिसणार आहे, असे पोस्टरवरुन दिसून येते.

येत्या 22 सप्टेंबरला ‘भूमी’ सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. मोठ्या कालावधीनंतर संजय दत्त पुनरागमन करत असल्याने सिनेमाची उत्सुकता मोठ्या प्रमाणात आहे. त्यात पोस्टर पाहता या सिनेमाची आणि संजय दत्तच्या लूकची उत्सुकता आणखीच वाढली आहे.

https://twitter.com/OmungKumar/status/891021171365470208