Entertainment News : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त दमदार अभिनेत्यांपैकी एक आहे. हिरोसह विलनच्या भूमिकांनाही त्याने न्याय दिला आहे. संजय दत्त नायकाच्या भूमिकेत असो किंवा खलनायकाच्या आपल्या प्रत्येक भूमिकेने त्याने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे. संजय दत्तने अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. एका अभिनेत्री संजय दत्तसोबत शूटिंगदरम्यानचा किस्सा शेअर केला आहे.


संजय दत्तसोबत शूट करताना घाबरली होती अभिनेत्री


अभिनेता संजय दत्तसोबत बेडरुम सीन शुटिंग करताना एक अभिनेत्री खूप घाबरली होती. हा सीन शूट करताना तिने एवढा धसका घेतला होता की,   या सीनच्या शुटिंगवेळी तिचे हात-पाय पडले गार अन् होठंही कापू लागले होते. भीतीमुळे अभिनेत्री थरथर कापत होती. ही बाब संजय दत्तच्या लक्षात येताच त्याने अभिनेत्रीला मदत केली आणि सीनंच शुटिंग पूर्ण केलं.


संजय दत्तसोबतच्या बेडरुम सीनचा अभिनेत्रीने घेतला धसका


संजय दत्तसोबतचा हा किस्सा शेअर करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. 2000 मध्ये आलेल्या मिशन काश्मीर चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने संजय दत्तसोबत काम केलं होतं. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी संजय दत्तच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. 


मिशन काश्मीर चित्रपटादरम्यानचा किस्सा


मिशन काश्मीर चित्रपटामध्ये सोनाली कुलकर्णी हृतिक रोशनची आई देखील होती. या चित्रपटाची कथा अल्ताफ हुसेन या काश्मीरमधील तरुणाभोवती फिरते. अल्ताफ हुसेनची भूमिका हृतिक रोशनने साकारली होती. अल्ताफचं संपूर्ण कुटुंब संजय दत्तने साकारलेल्या इन्स्पेक्टर इनायत खानच्या नेतृत्वाखालील पोलिस ऑपरेशनमध्ये मारलं जातं. इनायत खान अल्ताफला दत्तक घेतो, पण, ज्याने आपल्या कुटुंबाला मारले तो स्वतः इनायत खान आहे, हे सत्य जेव्हा अल्ताफला कळतं, तेव्हा तो त्याच्या बापाच्या विरोधात जातो.


हात-पाय पडले गार अन् होठंही कापू लागले


नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सोनाली कुलकर्णीने या चित्रपटातील एका बेडरूम सीनबद्दल सांगितलं. हा बेडरुम सीन तिच्या आणि संजय दत्तमध्ये शूट झाला होता. सोनालीने सांगितलं की, ती या सीनमुळे खूप घाबरली होती. त्यानंतर तिच्या हेअर ड्रेसरने तिला विचारलं होतं की, तिने वॅक्सिंग केलं आहे की नाही. हे ऐकून ती आणखीनच घाबरली. ती म्हणाली, मी गाऊन घातला होता, पण सीनसाठी योग्य पोजिशन घेता आली नाही. माझे हात पाय थरथरत होते. ओठ फडफडत होते. 


नेमका काय सीन शूट करायचा होता?


सीनबद्दल सोनालीने सांगितलं की, अल्ताफने आज मला अब्बा म्हटलं, असे संजय सांगतो. तर मी म्हणाली की, त्याने मला आधीच अम्मी म्हटलं आहे. आम्ही याबद्दल थोडा वाद घालतो आणि मग या संवादानंतर, आम्ही मिठी मारल्यानंतर सीन संपतो. फक्त एवढाच सीन होता.


नेमकं काय घडलं?


संजय दत्तच्या लक्षात आलं की, मी या दृश्यामुळे खूप घाबरलेली आहे. यानंतर त्याने मला समजावलं. संजय दत्त म्हणाला, "हे बघा, हा एक सर्वसामान्य सीन आहे. त्यामधे किसही नाही. फक्त दोन डायलॉग आणि एक मिठी. मी आधीच खूप चिंतेत आहे. तू सुद्धा एवढी घाबरलीस तर हा सीन होणार नाही, बेटा". त्यानंतर तो सीन खूप छान शूट झाला होता. त्यात काहीच नव्हतx. संजय दत्त खूप गोंड आहे, असंही तिने म्हटलं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Minahil Malik Video : प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा MMS लीक, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल; कोण आहे मिनाहिल मलिक?